MLA Dr. Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : विद्यार्थ्यांनी खेळांतून भवितव्य घडवावे : आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये

Bicholim News : डिचोली शांतादुर्गा शाळेचा क्रीडा महोत्सव उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली, अभ्यासाबरोबरच खेळांनाही महत्त्व आहे. मैदानी खेळांमुळे शरीर तंदुरुस्त राहतानाच, भवितव्य घडविण्याची संधी आहे, असे मत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केले. पालकांनी आपल्या पाल्यांची आवड ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहनही त्यांनी केले.

विद्यावर्धक मंडळ संचलीत श्री शांतादुर्गा प्राथमिक शाळेच्या क्रीडा महोत्सवात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर काल क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, उपाध्यक्ष सदाशिव वालावलीकर, सचिव तथा माजी सभापती राजेश पाटणेकर, खजिनदार राजेश धोंड, डॉ. शेखर साळकर, क्रीडा अकादमीचे अध्यक्ष अभिजित तेली, साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, पालक शिक्षक संघाचे डॉ. कौस्तुभ पाटणेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शाळेच्या शिक्षिका प्रमुख सुविद्या गणपुले यांनी स्वागत केले. राष्ट्रगीताने महोत्सवाची सांगता झाली.

उत्कृष्ट कवायतींचे सादरीकरण

विजय सरदेसाई यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावून आणि क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून या क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले.

क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी संचलन तसेच वेगवेगळ्या कवायती उत्कृष्टपणे सादर केल्या. नृत्यांद्वारे देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यावेळी विविध मैदानी खेळ घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

काजू हंगाम ओसरला, फेणीच्या भट्ट्या थंडावल्या, बोंडूच्या कमतरतेमुळे उत्पादनात 50 टक्के मोठी घट; डिचोलीत फेणीचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Tiger Death: गोव्याच्या जंगलात सांडतेय वाघांचे रक्त! प्रशासनाची मात्र डोळेझाक; केरी, गोळावली नंतर आता साकोर्डा,वाघांच्या हत्यांची मालिका थांबेना

Morajit Traffic Jam: मोरजीत वाहतुकीचा खेळखंडोबा! रस्त्याच्या बाजूनेच वाहनांचे ‘पार्किंग’; नागरिक त्रस्त

Pakistan Donkey Meat Export: चिनी कंपनीनं धमकी देताच पाकड्यांची तरारली, शाहबाज सरकारनं गाढवाच्या मांस निर्यातीला दिली मंजुरी; काय नेमकं प्रकरण?

VIDEO: पांढरी साडी, हवाई चप्पल अन् हातात झालमुडी! भाजप कार्यालयाबाहेर ममता 'दीदीं'चा अवतार पाहून कार्यकर्ते अवाक; 'हम्बा-हम्बा'नं उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT