डिचोली, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शिकवण प्रेरणादायी आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे आचरण करणे काळाची गरज आहे.
शिवरायांचे गुण आत्मसात करून वाटचाल केली तर ती खरी शिवजयंती ठरेल, असे उद्गार ज्येष्ठ वकील ॲड. हरिश्चंद्र एल. नाईक यांनी काढले.
कल्पवृक्ष संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. मये सम्राट क्लबच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
व्यासपीठावर शिक्षणतज्ज्ञ रामचंद्र गर्दे, तनुजा नेवगी, ॲड. अजय प्रभुगावकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेश शिरोडकर, परेश प्रभुगावकर, रुबिना शेख, मदन सावंत, बाबाजी प्रभुगावकर, गौरीश परब गावकर, संजय सालेलकर, ज्योत्स्ना नाईक आणि आयडियल हायस्कूलच्या निवडक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आयडियल हायस्कूलचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गावकर, परीक्षक तनुजा नेवगी, स्वाती नवाथे, स्पर्धेचे समन्वयक सोमनाथ पिळगावकर, कल्पवृक्षचे अध्यक्ष ॲड. अजय प्रभुगावकर, मये सम्राट क्लबचे अध्यक्ष अर्जुन नाईक, सचिव दीपक गडेकर, ज्ञानेश्वर बोरकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
प्रथम : पार्थवी संदीप पाळणी (श्री गणेश विद्यामंदिर, म्हापसा), द्वितीय : रुद्र राजेंद्र गोसावी (भूमिका हायस्कूल, पर्ये), तृतीय : पार्थ कामत सातोस्कर (डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल, साखळी),
उत्तेजनार्थ : वरदा पंकज चव्हाण (बालभारती विद्यामंदिर, रायबंदर) व चैतन्य उदय धुपकर (श्री शांतादुर्गा विद्यालय, डिचोली). तसेच माधुर्या नवसो मोरजकर (अष्टपैलू) या विद्यार्थ्यांचा कल्पवृक्षतर्फे गौरव करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.