students dropout rate Canva
गोवा

Goa Education: राज्यातील माध्यमिक विद्यार्थी गळतीचे प्रमाण 8 टक्के, 238 शाळांमध्ये एकच शिक्षक; ‘शालेय शिक्षण’चा अहवाल

Students dropout rate goa: राज्यात माध्यमिक पातळीवर विद्यार्थी गळतीचे प्रमाण ८.०७ टक्के आहे. त्यात १० टक्के मुलगे तर ५ टक्के मुली असल्याची माहिती समोर आली आहे.

Sameer Panditrao

Goa Educational Report

पणजी: राज्यात माध्यमिक पातळीवर विद्यार्थी गळतीचे प्रमाण ८.०७ टक्के आहे. त्यात १० टक्के मुलगे तर ५ टक्के मुली असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने प्रसिद्ध केलेल्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस २०२३-२४ अहवालानुसार, गोव्यातील शैक्षणिक स्थितीबाबत काही महत्त्वाच्या बाबी पुढे आल्या आहेत.

सदर अहवालानुसार, विद्यार्थी गळती ही प्राथमिक स्तरावर ०.८ टक्के तर उच्च प्राथमिक स्तरावर १.१ टक्के आहे. राज्यातील १ हजार ४८७ शाळांपैकी २३८ शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक आहे, ज्यात ३ हजार १४२ विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या २०२२-२३ मधील २३७ शाळांपेक्षा एकने वाढली आहे.

शाळांमधील विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर प्राथमिक स्तरावर २५:१ (राष्ट्रीय सरासरी २८:१) उच्च प्राथमिक स्तरावर १४:१ (राष्ट्रीय सरासरी २४:१), माध्यमिक स्तरावर ८:१ (राष्ट्रीय सरासरी १९:१), उच्च माध्यमिक स्तरावर १६:१(राष्ट्रीय सरासरी २७:१) आहे.

राज्यातील ७८९ सरकारी शाळांपैकी फक्त १५८ शाळांमध्ये (२० टक्के) शैक्षणिक उद्दिष्टांसाठी कार्यरत संगणक सुविधा आहेत, तर सरकारी अनुदानित शाळांमध्ये हे प्रमाण ९४.६ टक्के आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये ९२.९ टक्के आहे. स्मार्ट वर्ग फक्त ८.२ सरकारी शाळांमध्ये उपलब्ध आहेत, जे राष्ट्रीय सरासरी २१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. सरकारी अनुदानित शाळांमध्ये हे प्रमाण ४३.४ टक्के आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये ४८ टक्के आहे. दरम्‍यान, सदर अहवालानुसार, विशेषतः तांत्रिक सुविधा आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT