Sea Dainik Gomantak
गोवा

समुद्रात सेल्फी काढताना म्हैसूरचा विद्यार्थी बुडाला

सिक्केरी येथील घटना : सहा दिवसांतील दुसरी घटना

दैनिक गोमन्तक

कळंगुट : सिक्केरी समुद्रात सेल्फी काढताना मंगळवारी आणखी एक विद्यार्थी बुडाला. सहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

सिक्केरी समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी दुपारी म्हैसूरहून पर्यटनासाठी आलेल्या आठजणांच्या विद्यार्थ्यांच्या गटातील योहान नामक तरुण सेल्फीच्या नादात खडकावरून पाय घसरून पाण्यात पडून बेपत्ता झाला आहे.

दृष्टी या जीवरक्षक संस्थेच्या कामगारांनी बेपत्ता योहानचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटांमुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नव्हते. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही योहानचा पत्ता लागू शकला नाही.

गेल्या 8 जूनला अशाचप्रकारे केरळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निर्मल साजू या विद्यार्थ्यांचा सिक्केरी येथील समुद्रात सेल्फी घेताना पडून मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: नोकरी आणि व्यवसायात होणार पैशांचा महापूर! मंगळाचे रोहिणी नक्षत्रात गोचर; 24 जुलैपर्यंतचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान

New Education Policy: नवा आराखडा, नवी पुस्तके! नवीन शैक्षणिक धोरणाने बदलले देशातील शिक्षणाचे चित्र

Calangute Crime News: कळंगुटमध्ये क्राईम ब्रँचची मोठी कारवाई! देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणाच्या एकाला अटक तर पीडित महिलेची सुटका

Income Tax New Rules: आयकर भरण्याची कटकट संपली! करदात्यांना सरकारकडून सर्वात मोठी भेट; ITR-1 चा बदलला नियम

Retirement Life: निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, नवी सुरुवात! अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT