Mapusa Municipal Council
Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: मागण्या पूर्ण न झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांकडून संपाचे हत्यार

दैनिक गोमन्तक

गोवा पालिका कर्मचारी संघटनेने म्हापसा पालिकेला 10 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस बजावली आहे. पालिका येथील कर्मचाऱ्यांच्या मागणीची सनद पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहे, असा ठपका ठेवत हा निर्णय काल घेण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या गोवा पालिका कर्मचारी संघटनेने मंगळवारी म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना या संपाची नोटीस बजावली आहे. संपाच्या सूचनेची प्रत पालिका प्रशासन संचालक, मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, उपसभापती, मुख्य सचिव व नगरविकास सचिव यांनाही सादर केली आहे.

पालिका येथील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. नगराध्यक्षांनी आश्‍वासन देऊनही त्याचे पालन केले जात नाही. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे 10 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्याची नोटीस पालिकेस दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांनी दिली.

नगरपालिकेने करारपत्राचे नूतनीकरण केलेच नाही: संघटनेने पालिका मंडळाला गेल्या जून 2022 मध्ये 19 कलमी मागणी पत्र चार्टर्ड ऑफ डिमांड (Chartered of Demand) सादर केले होते. या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती. तसेच पालिका कर्मचारी संघटना व नगरपालिकेसोबतचा चार्टर्ड ऑफ डिमांड करारपत्राची मुदत गेल्या सप्टेंबर 2021 मध्ये संपुष्टात आली होती. या करारपत्राचे नूतनीकरण करण्याची मागणीही संघटनेने केली होती. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण केलेली नाही.

संघटनेने वेळोवेळी प्रश्न मांडले. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही. यावेळी निधन झाल्यास कर्मचारी किंवा कुटुंबीयांना हर्स व्हॅन उपलब्ध करुन देणे, पालिका युनियनचे कार्यालय, रोजंदारी कामगारांचे वेतन दर महिन्यांच्या 10 तारखेला किंवा त्यापूर्वी अदा करण्यात यावे, 12 वर्षे, आठ वर्षे आणि पाच वर्षे काम करणाऱ्या रोजंदारी कामगारांना नियमित करणे आदी मुद्यांचा यात समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT