Atal Setu Dainik Gomantak
गोवा

Panjim: ..यामुळे मेरशी अटल सेतूच्‍या टप्‍प्‍यात कचरा टाकण्‍यास सक्त बंदी

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विस्तार विभाग-7 (एनएच) पणजीच्या कार्यकारी अभियंत्यांनी आदेश जारी केला आहे.

दैनिक गोमन्तक

पाटो-पणजी येथील कदंब सर्कल ते मेरशी जंक्शनपर्यंत ‘अटल सेतू’च्या टप्प्यात कचरा टाकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विस्तार विभाग-7 (एनएच) पणजीच्या कार्यकारी अभियंत्यांनी आदेश जारी केला आहे.

कोणतीही व्यक्ती किंवा वाहन या आदेशाचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधित कायद्यातील तरतूदीनुसार कारवाई केली जाईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे. साफसफाई करूनही बांधकामाचा मलबा आणि कचरा या ठिकाणी सतत टाकला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर ही बंदी घालण्याची गरज होती, असे आदेशात म्‍हटले आहे.

मेरशी येथे हजारो खारफुटीची बेकायदा कत्तल करून जमीन बुजवण्यात आलेली आहे. त्‍याची पाहणी ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब व आमदार वीरेश बोरकर यांनी काल नगरनियोजन आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत केली होती. तेथे त्यांना ‘अटल सेतू’वरील जुना डांबर काढून टाकलेला कचरा देखील आढळला होता. ही समस्या गंभीर असून बांधकामाचा मलबा आणि कचरा टाकून खाजन जमीन बुजविण्याचे काम सुरू असल्याचे उभयतांनी निदर्शनास आणून दिले होते.

मनोज परब यांनी घेतली कृषी संचालकांची भेट

मनोज परब यांनी आज कृषी संचालक नेव्‍हिल आल्फोन्सो यांची भेट घेऊन मेरशी येथे घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांना अवगत केले. संचालकांना संबंधित प्रकरणाची माहिती देण्यात आली असून ते मेरशी टेनंट संघटनेशी चर्चा करून योग्य उपाययोजना करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे, असे परब यांनी पत्रकारांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT