Indian Railway  Dainik Gomantak
गोवा

Railway News: फुकट्या रेल्वे प्रवाशांविरोधात कारवाई होणार तीव्र

Railway News: 2 कोटींचा दंड वसूल : महिनाभरात 7 हजार विनातिकीट फिरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई

दैनिक गोमन्तक

Railway News: कोकण रेल्वे मार्गावर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एकूण 7 हजार 13 विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 2.05 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापूर्वी ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत 86 लाखांचा दंड वसूल करण्यात आलेला होता.

सध्‍या सुट्टीच्‍या काळात कोंकण रेल्‍वे मार्गावर प्रवासी वाढले असून त्‍यात फुकट्या प्रवाशांचीही भर पडली आहे हे यावरुन स्‍पष्‍ट झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर ऑगस्ट ते ऑक्‍टोबर २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १४,१५० अनधिकृत व अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले व त्यांना दंड आकारण्यात आला.

यातून एकूण ८६ लाख ३७ हजार ८२० रुपये दंड वसूल करण्यात आला. यात २३ ऑगस्टपर्यंत ४,४८४ प्रवाशांकडून २६ लाख ६७ हजार ५५५ रुपये दंड वसूल केला. २३ सप्टेंबरपर्यंत ४,८८८ प्रवाशांकडून २७ लाख ९ हजार ७०० दंड वसूल करण्यात आला. २३ ऑक्टोबरपर्यंत ४,७७८ प्रकरणे नोंद करत ३२ लाख ६० हजार ५६५ रुपये दंड वसूल केला. नोव्हेंबरमध्ये ही मोहीम तीव्र करत ७,०१३ जणांवर कारवाई करत २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४५ रुपये दंड वसूल केलेला आहे.

कोकण रेल्वेत तपासणी मोहीम

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांतून तिकीट नसताना प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. पुढील कालावधीत ही तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचेही सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT