Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा

'डिचोलीतील पायाभूत सुविधा मजबूत करणार'

डॉ. चंद्रकांत शेट्ये: सावरधाट-उसप येथे रस्‍ता काम सुरू

दैनिक गोमन्तक

साळ: डिचोली मतदारसंघातील पायाभूत सुविधा मजबूत करतानाच प्रत्येक गावात विविध विकासाभिमुख योजना अंमलात आणून त्यांचे नियोजन वेळेत पूर्ण करण्याचा आपला मनोदय आहे. सर्व पाचही पंचायती तसेच पालिका मंडळाने गरज ओळखून प्रकल्प निश्‍चित करावेत, आम्ही सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्ण करण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करू, असे आश्‍‍वासन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिले.

सावरधाट-उसप येथे सुमारे 46 लाख रुपये खर्चून अंतर्गत रस्‍ता दुरुस्‍ती व हॉटमिक्सिंग डांबरीकरण कामाचा शुभारंभ केल्‍यानंतर शेट्ये बोलत होते. यावेळी लाटंबार्से जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, सरपंच ज्ञानेश्वर गावस, पंच यशवंत वरक, माजी सरपंच बाबासाहेब राणे, दिलीप राणे, शंकर गावकर, पवन राणे आदी मान्‍यवर उपस्थित होते.

डिचोली मतदारसंघातील विविध प्रकल्प पूर्ण करून नवे प्रकल्प हाती घेणे यासाठी अधिकाऱ्यांशी सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. मर्यादित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सहकार्य घेऊन चालना देणार असल्याचे आमदार शेट्ये यांनी सांगितले. अनेक विकासाभिमुख प्रकल्‍प राबवून डिचोली मतदारसंघाचा चेहरामाेहरा बदलण्‍याला आपले प्राधान्‍य असेल, असेही त्‍यांनी पुढे बोलताना स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT