Goa's Street food Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 4 स्ट्रीट फूड नक्की चाखून पहा

Goa's Street food: तुम्ही जर गोव्यात असाल तर या स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

Puja Bonkile
SAUSAGE BREAD

SAUSAGE BREAD

पोर्तुगीज्यांच्या काही रेसिपी आजही इथल्या कॅथलिक ख्रिश्चन घरांमध्ये केल्या जातात चोरीस हि त्यातलीच एक. cheris-pork sausageभारतात सर्वप्रथम पावाची निर्मिती गोव्यात पोर्तुगीजांकडून झाली. त्यामुळे गोव्यातल्या खाद्यसंस्कृतीमध्ये पावाला विशेष महत्व आहे. ब्रेकफास्टपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे पाव इथे खाल्ले जातात. चोरीस हा मांसाहारी स्नॅक्स प्रकारात मोडणारा पदार्थ. यातला चोरीस हा ‘सॉसेज’ चे एक प्रकार आहे. बीफ, पोर्क, चिकन, प्रॉन्स यापासून तयार केलेले वेगवेगळे सॉसेज म्हणजेच चोरीस. या सॉसेजचे बारीक पातळ काप करून कधी ते छान खरपूस फ्राय करून तर कधी तसेच खाल्ले जातात. पावात कांदा, गाजर यांच्या बरोबर सलाड बरोबर सॉसेजचे पातळ काप घालून सोबत वेगवेगळ्या चटण्या घालून खायला दिले जाते. हा पाव 60 ते 180 रुपयाला मिळतो. (Goan Street food)

Cutlet Bread

CUTLET BREAD

कटलेट ब्रेड हे त्या स्नॅक्सपैकी एक आहे जे गरम केकसारखे विकले जाते!डिसील्वाची कटलेट्स पणजीत मिरामार बीचवर गेल्यावर चाट, शेवपुरी आणि स्नॅक्सच्या अनेक गाड्या दिसतात.या गाड्यावर कटलेट तब्ब्ल 120 प्रकार खायला मिळतात. बीफ कटलेटसाठी प्रसिद्ध अशा स्टॉलवर खवय्ये गर्दी करतात. बीफच्या मोठ्या तुकड्याला आधी आलं -लसूण पेस्ट आणि व्हिनेगर लावून मॅरीनेट करून मग रव्यामधून घोळून तेलात डीप फ्राय केला जातो. लोकल कडक पावत कांदा,गाजर, मियॉनीज आणि बीफचा तळलेला कुरकुरीत तुकडा घालून दिलं जातं. बीफ चिली फ्राय, पोर्क क्रीम चॉप सारखे वेगळे पदार्थ इथे मिळतात. ‘फिशिटेरिन’ खवय्यांसाठी खास चविष्ट फिश कटलेट देखील इथे मिळतात. समुद्र किनाऱ्यावर भटकंती झाल्यावर भूक लागली की अनेकांचे पाय आपोआप डिसील्वाची कटलेट खायला वळतात. हा पदार्थ 60 किंवा 150 रुपयाला मिळतो.

PAYA SOUP

PAYA SOUP

गोव्यातील (Goa) स्ट्रीट फूड पाया सूपशिवाय पूर्ण होत नाही. मटनाचा रस्सा सूप म्हणून दिला जातो. पाया सूप पौष्टिक आणि आरोग्यदायी (Healthy) मानला जातो. विशेषत: जर लोकांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल आणि सामान्य सर्दीपासून दूर ठेवायचे असेल तर या सूपचे सेवन करावे. या पाया सूपची किमत 20 ते 25 रुपये आहे.

ROS OMELET

ROS OMELET

गोव्यात आणखी एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड (Street Food) म्हणजे रॉस ऑम्लेट. एका साध्या ऑम्लेटला अनोखी चव देण्याची कला गोवावासीयांनी मिळवली आहे! ऑम्लेट कांदे, टोमॅटो आणि मिरची टाकून तयार केले जाते आणि नंतर त्याला चिकन ग्रेव्ही बरोबर सर्व्ह केले जाते.वरुन बारीक कांदा, टोमॅटोने सजवले जाते. रॉस ऑम्लेट हे गोव्यातील सर्वात जुने स्ट्रीट फूड असून अनेक लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे. याची किंमत 45 ते 180 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT