Aldeia de Goa Bambolim Crime News Dainik Gomantak
गोवा

Bambolim: मर्सिडीज अंगावरुन चालविल्याने झोपलेल्या कुत्र्याचा मृत्यू, आगशी पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी समोर आलेल्या व्हिडिओनंतर पोलिसांनी याची दखल घेत कार चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Pramod Yadav

Aldeia de Goa Bambolim

झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावरुन मर्सिडीज कार चालविल्याने जखमी झालेल्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी समोर आलेल्या व्हिडिओनंतर पोलिसांनी याची दखल घेत कार चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. उत्तर गोवा पोलिसांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत माहिती दिली आहे.

बांबोळी येथे भटक्या कुत्र्यावर चालविल्या कारचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेतली असून, आगशी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बांबोळी येथे रहिवासी सोसायटी गेटच्या बाहेर रस्त्यावर एक भटका कुत्री झोपल्याचे दिसत आहे. यावेळी गेटमधून मर्सिडीज कार बाहेर पडताना दिसत आहे. रस्त्यावर झोपलेला कुत्रा दिसत असताना देखील कार चालकाने कुत्र्याच्या अंगावरुन कार चालवल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

यात कुत्रा जखमी झाला यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT