Bodgeshwar Jatra 2024 Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Jatra 2024: भिकोदादाची भक्ती अन् दृष्टांत

Bodgeshwar Jatra 2024: श्री देव बोडगेश्‍वराची महती जसजशी सर्वदूर पोहचू लागली तशी दर रविवारी आणि बुधवारी भाविकांची संख्या वाढू लागली. अन्य आठवड्यातील दिवशीही देवदर्शनासाठी भक्तांची ये-जा अन् गर्दी वाढू लागली.

दैनिक गोमन्तक

Bodgeshwar Jatra 2024: कित्येक वर्षांपूर्वी खोर्ली- म्हापसा येथील एक व्यक्ती (कै.) भिकू बाबू केरकर (भिकोदादा) विद्यमान देवस्थानच्या ठिकाणी दररोज यायचे. एका स्त्रीवर अवसार आल्यानंतर तिने सांगितल्यानुसार ‘भिकोदादा’ यांनी दरदिवशी देवस्थानाच्या ठिकाणी येऊन देवाची भक्ती करण्यास प्रारंभ केला.

अखेर त्यांना दृष्टांत झाला. त्या दृष्टांताप्रमाणे ते दरदिवशी सायंकाळी तिन्हीसांजेच्या सुमारास खोर्ली येथील टेकडीवर अर्थात ‘घाटी’वर श्री बोडगेश्वराचा भाऊ श्री घाटेश्वराला दिवा लावू लागले. दिवा विझू नये म्हणून त्यांनी तेथील खडकाला भोक पाडले होते. त्यामुळे वाऱ्या-वादळात, पावसाळ्यातही दिवा बराच वेळ संथपणे तेवत राहायचा.

श्री देव बोडगेश्‍वराची महती जसजशी सर्वदूर पोहचू लागली तशी दर रविवारी आणि बुधवारी भाविकांची संख्या वाढू लागली. अन्य आठवड्यातील दिवशीही देवदर्शनासाठी भक्तांची ये-जा अन् गर्दी वाढू लागली.

या दैवताने कित्येकांना दृष्टांत दिलेले आहेत. त्या काळात बहुतांश लोकांना पायी चालत जाऊन प्रवास करावा लागायचा. घरी परतताना कधी कधी त्यांना रात्र होत असे. वाटेत कुणीच नसायचा. अशा त्या निर्जन भयाण रात्रीच्या वेळी एकान्तवासात मार्गक्रमण करताना लोक बोडगेश्वराला साद घालायचे.

बोडगेश्वरानेच दिलेल्या धीराने ते मार्गक्रमण करायचे. अशा या लोकांना धोतर नेसलेला, खांद्यावर कांबळ घेतलेला, पायांत जाड वहाणा आणि डाव्या हातात चुडी किंवा मशाल, तर उजव्या हातात दंडुका धारण केलेली व्यक्ती दिसायची. अस्पष्टपणे दिसणारी व्यक्ती म्हणजे साक्षात श्री देव बोडगेश्वराची मूर्ती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT