Bodgeshwar Jatra 2024: बोडगेश्‍‍वराचा आजपासून जत्रोत्सव; जाणून घ्या कार्यक्रमाचे नियोजन

Bodgeshwar Jatra 2024: म्‍हापशात भक्तिमय वातावरण : वर्धापनदिन सोहळा उत्‍साहात
Bodgeshwar Jatra 2024
Bodgeshwar Jatra 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Bodgeshwar Jatra 2024: म्‍हापसावासीयांचा ‘राखणदार’ आणि गोवा तसेच शेजारील राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव बोडगेश्‍‍वराचा ३१वा वर्धापनदिन सोहळा आज मंगळवारी विविध धार्मिक व श्रींच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करून साजरा करण्यात आला. तर, बुधवार, 24 रोजी 89 व्‍या जत्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यंदा जत्रोत्सव 13 दिवस चालणार आहे.

Bodgeshwar Jatra 2024
Goa BJP: अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने साधली प्रचाराची संधी

श्रींच्या मूर्तिप्रतिष्ठापनेच्‍या 31 व्‍या वर्धापनदिनानिमित्त आज सकाळी देवस्थानचे सचिव अ‍ॅड. वामन पंडित व पत्नी वीरा पंडित यांच्या यजमानपदाखाली देवाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी 4 वाजता 5 ते 9 आणि 10 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा झाली.

सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव साजरा करण्यात केला. रात्री ८.३० वाजता म्हापसा ओम सत्य साई मंडळातर्फे प्रार्थना व भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर दारुकामाची आतषबाजी झाली.

दरम्यान, केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, उपसभापती जोशुआ डिसोझा, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके, आजी-माजी नगरसेवक यांनी श्रींचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद भाईडकर व सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, जत्रोत्सवात पुढीलप्रमाणे कार्यक्रम सादर होतील. बुधवार, २४ रोजी दु. १२ वा. श्री देव बोडगेश्वराचा जत्रोत्सव. दु. १ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. नवदुर्गा दिंडी पथक बोरी यांचा दिंडी कार्यक्रम. सायं. ६ वा. नवदुर्गा भजनी मंडळ बोरी यांचे भजन. रात्री १२ वा. ‘कालचक्र’ पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग.

गुरुवार, २५ रोजी सकाळी १० वा. महापूजा व दु. १ वा. महाप्रसाद होईल. सायं. ५.३० वा. रेश्मा गवस यांचे तबला वादन होईल. सायं. ७ वा. ‘चांदणे स्वरांचे’ ही मैफील होईल. यात नवाब शेख, अक्षता रामनाथकर तसेच मुक्ता मिसर हे कलाकार गायन करतील.

शुक्रवार, २६ रोजी सकाळी १० वा. पिकअप ड्रायव्हर असोसिएशनतर्फे महापूजा व दुपारी महाप्रसाद होईल. सायं. ५.३० वा. बालकीर्तनकार सर्वेश साळगावकर कीर्तन सादर करणार आहेत. सायं. ६.१५ वा. डॉ. राजेश भटकुर्से तबला वादन करतील. सायं. ७.१५ वा. ‘नक्षत्रांचे देणे’ ही मैफील होईल.

Bodgeshwar Jatra 2024
Lok Sabha Election: नावेलीतून 10 हजार मते मिळवून देणार; महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आश्वासन

शनिवार, २७ रोजी सकाळी १० वा. म्हापशातील मासळी विक्रेत्यांतर्फे महापूजा. सायं. ५.१५ वा. ‘स्वर अक्षय’ मैफील होईल. रात्री ८.३० वा. मोहक सिद्धकला डान्स अकादमी अ‍ॅण्ड इव्हेंटतर्फे नृत्य कार्यक्रम.

रविवार, २८ रोजी सकाळी १० वा. रिक्षा ड्रायव्हर असोसिएशन (कदंब स्टॅण्ड) म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी १ वा. महाप्रसाद. सायं. ५.३० वा. संदेश खेडेकर यांचा गायनाचा कार्यक्रम. रात्री ८.३० वा. मुद्रा सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमात अंतरा व साथी तसेच आरती नाईक (कांदोळी) यांचे नृत्य.

सोमवार, २९ रोजी सकाळी १० वा. म्हापसा पालिकेतर्फे सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ६.३० वा. दिंडी कार्यक्रम, रात्री ८.३० वा. ‘डान्स व्हाईब्स’ उपशास्त्रीय नृत्य कार्यक्रम, सादरकर्ते दुर्वा पांगम. ‘स्वर अभिषेक’,

‘सूरईश्वर’, ‘स्वर चैतन्याचे’ रंगणार

गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी सायं. ५.३० वा. नृत्याचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम श्वेता व त्यांचे साथी कलाकार सादर करतील. सायं. ७.३० वा. ‘सूरईश्वर’ ही संगीत मैफील होईल. विनय महाले व वेदा नेरूरकर (मुंबई) हे सादरीकरण करतील. शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वा. बाल भवनच्या मुलांचा गायन, वादन, नृत्य कार्यक्रम होईल. शनिवार, ३ रोजी सायं. ६ वा. कला व संस्कृती संचालनालय पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम, सादरकर्ते वैष्णवी जोशी व साथी. रविवार, ४ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वा. ‘स्वर चैतन्याचे’ मैफील. सादरकर्ते सुभाष पवार आणि नम्रता जोशी. रात्री ८ वा. ‘भरतनाट्यम’ सादरकर्ते मंदिरा तिरोडकर जोशी व साथी कलाकार.

‘स्वरांजली’ कार्यक्रम

मंगळवार, ३० रोजी सकाळी १० वा. म्हापसा भाजी विक्रेत्यांतर्फे महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ५.३० वा. ‘स्वर अभिषेक’ मैफल. सादरकर्ते अभिषेक काळे आणि भाग्यश्री आठल्ये जोशी. बुधवार, ३१ रोजी सायं. ५.३० वा. ‘स्वरांजली’ मराठी सुगम संगीत कार्यक्रम, गायक गणेश मेस्त्री (पुणे) व किशोरी मुर्के (मुंबई) हे असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com