Shores of Goa Dainik Gomantak
गोवा

गोवा किनाऱ्यांवरील गैरकृत्‍यांना फाटा

व्‍हेंझी व्‍हिएगस: विधानसभेत विधेयक मांडणार

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: किनाऱ्यांवरील बेकायदा व्यवसायांना आळा घालण्‍यासाठी विधानसभा अधिवेशनात आपण विधेयक मांडणार आहे, असे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांनी सांगितले. कोलवा किनाऱ्याची पाहणी केल्‍यानंतर ते बोलत होते.

किनाऱ्यावर दारू पिण्यासाठी बंदी असूनही पर्यटक दारूच्या बाटल्या घेऊन येतात. फेरीवाल्यांच्या संचारास बंदी असूनही त्यांचा वावर वाढतोय. तसेच अन्य गैरकृत्‍यांनाही ऊत आला आहे. आपण स्थानिक पंचायतीला विश्वासात घेऊन यावर तोडगा काढणार असल्‍याचे व्‍हिएगस यांनी कोलवा किनाऱ्याची पाहणी केल्‍यानंतर सांगितले.पोलिस व पर्यटन खात्‍याने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. किनारी भागांत चालणाऱ्या गैरकारभाराला आळा घालण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे, असेही व्‍हिएगस म्‍हणाले.

कॉन्‍स्‍टेबल करतो खंडणी वसूल!

आमदार व्‍हिएगस यांनी पोलिसांच्‍या कारभारावरही ताशेरे ओढले. ते म्‍हणाले की, कोलवा पोलिस स्‍थानकात जो कॉन्‍स्‍टेबल आहे, तो कधीही गणवेश घालत नाही. त्‍याला काही वरिष्‍ठ अधिकारीही दचकून असतात. रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत हा कॉन्‍स्‍टेबल खंडणी वसूल करतो, असा सनसनाटी आरोपही त्‍यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT