Stop the smuggling of alcohol Dainik Gomantak
गोवा

Goa: दारूची तस्करी बंद करा

अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना दयानंद सोपटे , अबकारी खाते काम करते त्यात सुधारणा होण्याची गरज आहे(Goa)

दैनिक गोमंतक

पणजी:गोव्यातून दारूची तस्करी होते. ती दारू महाराष्ट्रात पकडली जाते. यामुळे गोव्याच्या सीमेवरील अबकारी खाते काय करते असा प्रश्न निर्माण होतो असे मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी आज विधानसभेत म्हण्टले आहे.

अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना दयानंद सोपटे , अबकारी खाते काम करते त्यात सुधारणा होण्याची गरज आहे. सीमा पार केल्या जाणाऱ्या दारूच्या प्रमाणात घट झाली असली तरी त्यात आणखीन घट होणे अपेक्षित आहे. अबकरी खात्याने सीमेवर काम केले तर सरकारच्या महसुलात वाढ होऊ शकते.तसेच वीज व इतर गोष्टी मोफत देण्याची कोणी घोषणा केली तरी त्यांची डाळ गोव्यात शिजणार नाही. काहीजण सत्तेत असताना त्यांना काही मोफत देणे जमले नाही ते आता मोफत देण्याच्या गोष्टी करत आहेत असे म्हणत आम आदमी पक्षावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.

दरम्यान आज झालेल्या पहिल्याच दिवशीच्या विधानसभा अधिवेशनात जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली विरोधी आमदार विधानसभेत नाटके करण्यासाठी येतात या विधानसभा कामकाज मंत्री माविन गुदिन्हो यांच्या विधानावरून विरोधी आमदार आक्रमक झाले. त्यांनी सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतली. यामुळे सभापतींना विधानसभेच्या कामकाजाची वेळ वाढवलेली असतानाही कामकाज तहकूब झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT