Galgibaga Gram Sabha: नदीपात्रात भराव घालून उभारली बांधकामे
Canacona Galgibaga River Dainik Gomantak
गोवा

Canacona News: गालजीबाग येथील पर्यावरणास घातक प्रकल्प रोखा! स्थानिक आक्रमक

गोमन्तक डिजिटल टीम

पैंगीण पंचायत क्षेत्रातील मागदाळ- गालजीबाग प्रभागातील पर्यावरणाला घातक प्रकल्पांना अटकाव करा, अशी जोरदार मागणी येथील ग्रामस्थांनी आज ग्रामसभेत केली.

गालजीबाग होडी धक्क्याजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव घालून बांधकामे केली आहेत. येथे नदीचे मुख असल्याने पावसाळ्यात पाणी अडून पुराची शक्यता असल्याचे ग्रामस्थ सेबी बार्रेटो यांनी सांगितले.

पंचायतीने हे बांधकाम करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून बांधकाम बंद करण्याचा आदेश देण्याची मागणी केली. यासंदर्भात किनारी व्यवस्थापन यंत्रणा त्याचप्रमाणे, नगरनियोजन खाते व काणकोण उपजिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला.

यावेळी झालेल्या चर्चेत विजयकुमार प्रभुगावकर, अजित पैंगीणकर, प्रदीप मोखर्डकर, वैजयंती प्रभुगावकर, विराज पै खोत, पंच सतीश पैंगीणकर आणि ग्रामस्थांनी सूचना मांडल्या. सरपंच सविता तवडकर यांनी, प्रत्येक घरासाठी कचरा संकलन शुल्क म्हणून प्रतिवर्ष शंभर रुपये आकारण्यात येणार असल्याचे सांगितले.

या विषयावर दीर्घ चर्चा होऊन जुलै महिन्यापासून हे शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. कमर्शियल आस्थापनांसाठी प्रतिवर्ष पाचशे रुपये शुल्क करण्यात येणार आहे. मात्र, यासंबंधी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हृदयविकाराच्या दुर्मिळ आजाराने जन्माला आले बाळ, 300 मिनिटांत बंगळुरुला एअरलिफ्ट करुन दिला दुसरा जन्म

Goa Today's News Live: दामोदर सप्ताहाचे यंदा 125वे वर्ष, 1 कोटी महसूलाचे टार्गेट!

Goa Mining: खाण कंपन्यांचे अर्ज पहिल्या फटक्यात मंजूर केलेले नाहीत; अडवलपाल, शिरगाव खाणींचेही दाखले अडले

Mhadei River: गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकसाठी महत्वाच्या म्हादईची 'प्रवाह'कडून पाहणी, 'जीवनदायिनी'साठी गोव्‍याची धडपड

Goa: पाच फूट अन् 45 किलोचा एक घड! सत्तरीतील शेतकऱ्याची कमाल; टिश्यू कल्चर पद्धतीनं घेतलं केळीचं उत्पादन

SCROLL FOR NEXT