Coal Transportation Dainik Gomantak
गोवा

Coal Transportation: 'कोळसा हाताळणी कायमस्वरुपी बंद करा'

मुरगाव बंदरातून होणारी कोळसा हाताळणी कायमस्वरुपी बंद करण्यासाठी या तालुक्यातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणावा, अशी मागणी ‘गोवा अगेन्‍स्‍ट कोल’ या संघटनेने केली आहे.

दैनिक गोमन्तक

Coal Transportation: मुरगाव बंदरातील धक्का क्र. 5 व 6 वर कोळसा वाढविण्याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेले मंजुरीपत्र त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी ‘गोवा अगेन्‍स्‍ट कोल’ या संघटनेने केली आहे. तसेच मुरगाव बंदरातून होणारी कोळसा हाताळणी कायमस्वरुपी बंद करण्यासाठी या तालुक्यातील आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर दबाव आणावा, अशी मागणीही केली आहे.

खारीवाडा-वास्को येथील ओल्ड क्रॉस कार्यालयात आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ‘गोवा अगेन्‍स्‍ट कोल’चे निमंत्रक ख्रिस्तोद डिसोझा यांनी, मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी दुपटीने वाढविण्यासाठी केंद्राने दिलेल्‍या आदेशाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.

ते म्‍हणाले, 2011 पासून मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी बंद करण्याची मागणी आम्ही करीत आलो आहोत. कोळसा प्रदूषणामुळे मुरगाव, वास्को परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. समुद्रातील जनजीवनावरसुद्धा परिणाम होऊ लागला आहे.

आता तर केंद्राने मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी वाढविण्याची मंजुरी देऊन येथील जनतेला आणखीन त्रासात टाकले आहे. यासाठी मुरगाव व वास्कोच्या आमदाराने त्वरित पर्यावरण मंजुरीला विरोध करावा.

तसेच मुख्यमंत्र्यांकडे मुरगाव बंदरातील कोळसा वाढविण्यास विरोध करून पर्यावरण मंजुरी रद्द करण्याची मागणी करावी.या पत्रकार परिषदेला नझीर खान, संजय रेडकर व इतर पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

केंद्रासमोर झुकू नका

वालेन्‍सियो सिमॉईश म्‍हणाले की, गोवा हे कोळसा हाताळण्यासाठी योग्य ठिकाण नाहीय. केंद्र व राज्य सरकारने मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी कायमची बंद करावी.

तर, कोळसा हाताळणीविरोधात यापूर्वी आंदोलन केलेले कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले की, राज्य सरकारने नियम, कायदे पायदळी तुडवून लोकांच्‍या जमिनी हस्तगत केल्या आहेत. राज्य सरकारने केंद्रापुढे न झुकता कोळसा पर्यावरण मंजुरीपत्र मागे घेण्यासाठी दबाव आणावा.

आमदाराने भूमिका स्‍पष्‍ट करावी

समाजकार्यकर्ते जयेश शेटगावकर यांनी सांगितले की, मुरगाव बंदरातील कोळसा वाहतूक वास्को शहरातून करण्यास विरोध करणे हे एका प्रकारचे नाटक होते. हे सर्व आंदोलन फक्त वाहतुकीचे कंत्राट प्राप्त करण्यासाठी केले होते. मुरगावचे आमदार कोळसा वाहतुकीविरोधात आहेत की कोळसा हाताळणी दुप्पट करण्याच्या बाजूने, ते त्‍यांनी जनतेपुढे स्पष्ट करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT