Garbage  Dainik Gomantak
गोवा

कचरा जाळणे थांबवा,अन्यथा रस्त्यावर उतरू; केळशीतील ग्रामस्थ आक्रमक

स्थानिक पंचायत व गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही रीतसर तक्रारी करून देखील याची दखल न घेतल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव: वेर्णा औद्योगिक वसाहतीबाहेर पुन्हा मोठ्या प्रमाणात कचरा टाकून नंतर तो जाळण्याचे प्रकार होऊ लागल्याने केळशीमधील रहिवासी आक्रमक बनले आहेत. कचरा जाळणाऱ्यांनी त्वरित हे प्रकार बंद न केल्यास रस्त्यावर उतरू,असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.स्थानिक पंचायत व गोवा (Goa) प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही रीतसर तक्रारी केल्या, पण त्यांची दखल घेतली न गेल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.

ग्रामस्थ गुरुवारी कचरा जाळण्याच्या जागेजवळ एकत्र आले व त्यांनी संबंधित सरकारी यंत्रणा व स्थानिक पंचायत या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही कारवाई का करत नाही, असा सवाल केला. ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे कोमुनिदादच्या जागेत अज्ञातांकडून सर्व प्रकारचा कचरा आणून टाकला जातो. नंतर तो रात्री,अपरात्री पेटविला जातो. त्यात प्लास्टिकच्या वस्तू, एसीचे इन्सुलेटर,सिरॅमिक्स, बेसीन , कमोड यांचाही समावेश असतो.

कचऱ्यातील (Garbage) या वस्तूंना आग लावल्याने प्रदूषण तसेच विषारी वायू तयार होऊन तो वातावरणात पसरत असतो. त्याचा सर्वाधिक त्रास जवळच्या भागातील रहिवाशी असलेल्या ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) व लहान मुलांना होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT