सत्तरी: पर्ये येथील साखळेश्वर देवस्थानच्या धार्मिक विधीवरुन निर्माण झालेला वाद चिघळला असून, आक्रमक स्थानिकांनी शुक्रवारी (२० डिसेंबर) उशीरा रात्री रस्त्यावर उतरत जाळफोळ सुरु केलीय. तसेच, मुख्य रस्ता अडवत निदर्शेने सुरु केली आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशीरा रात्री स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर टायर जाळला. तसेच, मुख्य रस्ता अडवत निदर्शेने केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर स्थानिकांनी दगडफेक केली असून, एक पीएसआय जखमी झाला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरुन पळ काढत नजीकच्या पेट्रोलपंपावर आश्रय घेतला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकचा फौजफाटा मागविण्यात आल्याची माहिती मिळतेय.
घटनास्थळी आक्रमक माजीक समाजाचे ५०० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. जाळफोळ, रस्ता अडवणूक आणि पोलिसांवर दगडफेक यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, पर्ये-सत्तरीतील साखळेश्वर देवस्थानच्या वर्धापनदिन सोहळ्यात एकाच गटाकडून धार्मिक विधी केल्याने तणाव झाला होता. वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गांवकर गटाची निदर्शने केली. पुढील दोन दिवसीय सप्ताह व गवळण उत्सव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भूमिका देवस्थान २४ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.