Stinking water Dainik Gomantak
गोवा

Stinking water: कचऱ्याखालून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी

आरोग्यास धोका : सोनसोडो येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची शॅडो कॉन्सिलची तयारी

गोमन्तक डिजिटल टीम

सोनसोडो कचरा प्रश्र्नावरुन नगरपालिका, आमदार व सरकारवर सतत टीका केली जात आहे. आता सोनसोडो येथे जो कचरा टाकण्यात आलेला आहे, त्याचे मोठे ढिगारे निर्माण झाले असून व कचरा उचलला नसल्याने कचऱ्याखालील घाणेरडे पाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची स्थिती उदभवली आहे. (Stinking water on Road)

सोनसोडो येथील ज्या रस्त्यावरुन कचऱ्याचे ट्रक आणले जातात तोच रस्ता आता या घाणेरड्या पाण्यामुळे निसरडा झाला आहे. त्यामुळे त्यावरुन ट्रक चालविणे धोक्याचे ठरत आहे.

यासंदर्भात, मडगावातील कचरा साळगाव येथील कचरा प्रकल्पात नेण्यासाठी नगरपालिका गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाला लिहणार असल्याचे मुख्य अधिकारी मानुएल बार्रेटो यांनी सांगितले होते.

कचऱ्यातून झिरपणारे पाणी काढून नेण्यासाठी मडगाव नगरपालिकेने तीन टाक्या खरेदी केल्या होत्या. पण सध्या या टाक्या धूळ खात पडलेल्या आहेत. एक दोन टाक्या कचऱ्याखाली गेल्याचे आम्ही पाहिले, असे शॅडो कॉन्सिलचे सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT