Panaji Old Buildings Dainik Gomantak
गोवा

Goa Safety Concern: पणजीत नागरिकांच्या जीवाशी खेळ! सांतिनेज परिसरातील धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष; रहिवाशांमध्ये भीती

Dangerous Buildings In Goa: पणजीतील सांतिनेज परिसरातील गामा पिंटो मार्गावरील पॅलेसियो दी गोवा हॉटेल परिसरातील काही खासगी इमारती जीर्ण झाल्या आहेत.

Sameer Panditrao

पणजी: पणजीतील सांतिनेज परिसरातील गामा पिंटो मार्गावरील पॅलेसियो दी गोवा हॉटेल परिसरातील काही खासगी इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींचा रस्त्याच्या बाजूचा भाग धोकादायक दिसत आहे.

पादचाऱ्यांना या इमारतींच्या खालून जाताना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. महानगरपालिकेला याची कल्पना असली तरी त्याविषयी कडक पावले उचलली जात नसल्याचे येथील नागरिक सांगतात.

रस्त्याच्या बाजूचे सज्जे आणि गॅलरीचे भाग जीर्ण झालेले आहेत. या इमारतींचा कालावधीही संपला आहे. काही ठिकाणी इमारतीच्या बांधकामाने जागा सोडली आहे, ते भाग कधीही कोसळू शकतात, अशी स्थिती आहे.

एका इमारतीचे प्लास्टरचे तुकडे निसटून खाली पडत आहेत. इमारतीच्या खालील एका दुकान चालकाने इमारतीचा तो धोकादायक कोपऱ्यावर प्लास्टिक जाळीदार तावदान लावले असले तरी तो तात्पुरता उपाय आहे. या इमारती रहिवाशांसाठी धोकादायक बनल्या आहेत, परंतु तेथील रहिवाशांचे स्थलांतर करण्याविषयी संबंधित सोसायटीने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

अनेक वर्षांपासून येथील जीर्ण इमारतींचा स्थलांतराचा विषय भिजत पडलेला आहे. खरे तर सोसायटीने आणि लोकप्रतिनिधींनी हा विषय तातडीने सोडविला पाहिजे, अघटीत घटना घडल्यानंतर धावाधाव करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया पणजीतील नागरिक व्यक्त करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tribal History: देवळात प्रवेश नाकारला, तर स्वतःची मंदिरे उभारली! गोव्यातील आदिवासी समाजाच्या जिद्दीची आणि अस्मितेची कहाणी

Cricketer Banned: टी-20 स्पर्धेदरम्यान कोकेनचे सेवन, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डोप टेस्टमध्ये फसला; क्रिकेट खेळणाऱ्यावर बंदी

Jharkhand Accident: झारखंडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकनं लोकांना चिरडलं; 3 महिला, 3 बालकांसह 7 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

Government Employee Transfers: तलाठी, लिपिक, शिपाई आता राज्यभर बदलीसाठी पात्र? सावंत सरकारकडून 'कॉमन केडर' लागू

SCROLL FOR NEXT