Dainik Gomantak
गोवा

Women's Commission: राज्य महिला आयोगाची समिती अखेर स्थापन

Women's Commission: आमदार दिलायला लोबोंचाही समावेश

दैनिक गोमन्तक

Women's Commission: दीड वर्षाच्या कालावधीनंतर गोवा राज्य महिला आयोगाची सरकारने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती स्थापन न झाल्याने या आयोगाकडे महिलांवरील अत्याचारासंदर्भातील सुमारे 200 हून अधिक प्रकरणे प्रलंबित होती.

समिती स्थापन झाल्याने या प्रकरणांवरील सुनावणीला लवकरच सुरवात होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षपदी रंजिता पै यांची यावर्षी मार्चमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, समिती नियुक्त करण्यास लोकांना सात महिन्यांची वाट पाहावी लागली आहे.

आयोगाच्या समितीमध्ये शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, डॉ. वृंदा बोरकर (एस.एस. धेंपे कॉलेज), डॉ. प्रीता मल्ल्या (व्हीव्हीएम श्री दामोदर कॉलेज), केपेच्या जनजागृती या बिगर सरकारी संस्थेच्या अरुणा धुरी, केतकी परब गडेकर (पर्वरी),

डॉ. ज्योती सावंत (डिचोली) व ॲड. सिद्धी पारोडकर (मडगाव) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या आयोगाच्या समितीची मुदत 2022 मध्ये संपली होती तेव्हा या आयोगाकडे सुमारे 322 प्रकरणे प्रलंबित होती. त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीनंतर आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती मार्च 2023 मध्ये करण्यात आली होती.

अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर सात महिन्यांनी अखेर सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचा कालावधी 3 वर्षांचा असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT