P. S. Sridharan Pillai Dainik Gomantak
गोवा

G20 Summit Goa: ‘जी 20’ मुळे राज्य पर्यटनास लाभ

राज्यपाल पिल्लई ः राजभवनात तयारी आढावा बैठकीत चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

G20 Summit Goa: राज्यात होणाऱ्या ‘जी२०’ च्या बैठका यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी दिली आहे. या बैठकांमुळे गोव्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासह पर्यटनाला फायदा होईल, असेही ते म्हणाले.

‘जी२०’चे पदाधिकारी आणि प्रतिनिधी मंडळाने आज राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन ‘जी२०’ बैठकांबाबतचा नियोजन आराखडा सादर केला.

जी-२० परिषदेसाठीचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन शृंगला, भारतीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंह यांनी येत्या महिन्यापासून गोव्यात होणार असलेल्या आठ बैठकांबाबतची माहिती सादर केली.

यावेळी राज्यपाल पिल्लई यांनी शाश्वत विकास संकल्पनेचा समावेश करण्यावर भर दिला. तसेच या बैठकांदरम्यान गोव्यातील अंतर्गत भागातील पर्यटनासही प्रोत्साहन देण्याची सूचना केली.

गोव्यामध्ये या परिषदेचे स्वागत करून राज्यपाल यांनी गोव्यातील श्रीमंत संस्कृती व वारसा यांचाही प्रसार करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली.

गोवा हा सांस्कृतिक आणि वास्तुशिल्प कलेबाबत श्रीमंत प्रदेश आहे. गोव्यातील या श्रीमंत वारशाची ओळख विदेशी प्रतिनिधींना या बैठकांदरम्यान करून देण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

बैठकीवेळी राज्यपालांनी गोव्यातील निसर्ग पर्यटन व गोमंतकीय वृक्षसंपदेचा वारसा यांचाही प्रसार करण्याची गरज मांडली. ‘जी२०’चे शिष्टाचार सचिव आणि राज्य नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज याप्रसंगी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT