Congress state president Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: संविधान बदलण्याचा भाजपचा डाव हाणून पाडा; पाटकरांचे तमाम भारतीयांना आवाहन!

Congress State President Amit Patkar Criticized BJP: देशात मनुवादी संस्कृती लादण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न होत आहे. सुजाण भारतीयांनी भाजपचा हा डाव मुळासकट हाणून टाकावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.

Manish Jadhav

कळंगुट: विविध भाषा आणि प्रांत यांचा समावेश असलेला भारत देश स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही अबाधित आणि एकसंध आहे याचे कारण म्हणजे डॉ. आंबेडकरांचे संविधान होय, परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यात काडीचाही सहभाग नसलेल्या भाजपकडून सध्या धर्माच्या नावाखाली समाज तोडण्याचे षडयंत्र सुरु आहे.

देशात मनुवादी संस्कृती लादण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न होत आहे. सुजाण भारतीयांनी भाजपचा हा डाव मुळासकट हाणून टाकावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.

भारतीय संविधान (Constitution) रक्षण यात्रेअंतर्गत बामणवाडा, शिवोलीत आयोजित विशेष सभेत पाटकर बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, शिवोलीचे माजी आमदार चंद्रकांत चोडणकर, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. के. शेख, जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, चंदन मांद्रेकर, रोशन चोडणकर, शिवोलीच्या गटाध्यक्ष पार्वती नागवेकर आदी उपस्थित होते.

विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव यांनी देशात पक्षांतर विरोधी कायदा बळकट करण्यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात विशेष विधेयक मांडणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशात सध्या हुकूमशाही सरकार कार्यरत असून देश अराजकतेकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले. माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर, एम. के. शेख, कॉग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष राजन घाटे यांचीही भाषणे झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT