Goa Taxi Issue Dainik Gomantak
गोवा

Benaulim: ..उबर ॲप वापरले, टॅक्सीचालकाला केले पोलिसांच्या हवाली; बाणावलीत स्थानिक व्यावसायिक संतप्त

Benaulim taxi drivers: गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या दाव्यानुसार तो टॅक्सीवाला वास्को येथील आहे. मोपावरून तो भाडे घेऊन बाणावली येथे आला होता.

Sameer Panditrao

मडगाव: राज्यात ओला व उबेर टॅक्सी सेवेला बंदी असतानाही या कंपन्या सेवा पुरवित असल्याचा आरोप बाणावली येथील टॅक्सीचालकांनी केला असून, गुरुवारी रात्री या भागात ग्राहकाला घेऊन आलेल्या उबेरच्या एका टॅक्सीचालकाला स्थानिक टॅक्सीवाल्यांनी पकडून कोलवा पोलिसांच्या हवाली केले.

यासंदर्भात कोलवा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या दाव्यानुसार तो टॅक्सीवाला वास्को येथील आहे. मोपावरून तो भाडे घेऊन बाणावली येथे आला होता. हा टॅक्सीवाला उबेरचे ॲप वापरत असून, त्याद्वारे तो बेकायदा व्यवसाय करतो.

नंतर आमदार वेन्झी व्हिएगस यांनी कोलवा पोलिस ठाण्यात येऊन, असा गैरप्रकार आम्ही खपवून घेणार नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ओला व उबेरला गोव्यात मनाई आहे, असे सांगितले होते.

मात्र, गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने सत्य काय ते दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले. स्थानिकांच्या व्यवसायावर आम्ही गदा येऊ देणार नाही, असे ते म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनीही असला प्रकार सहन केला जाणार नसल्याचे सांगितले. राज्यातील अशा बेकायदा सेवेवर कारवाई करताना त्यांची टॅक्सी जप्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.

देवेंद्र सातार्डेकर याच्या विरोधात तक्रार

उबेर टॅक्सी अॅपचा वापर करून बेकायदा भाडी मारणाऱ्या संशयित देवेंद्र सातार्डेकर याच्या विरोधात बार्देशातील पर्यटक टॅक्सी चालकांनी हणजुण पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, संशयित सातार्डेकर वाहतूक खात्याचा परवाना नसताना पर्यटकांची भाडी मारत असल्याने कायदा सुव्यवस्था तसेच पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पर्यटक टॅक्सी चालक नेते योगेश गोवेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच ३१८ खाली गुन्हा दाखल करून घेतला आहे. हणजुणचे पोलिस निरीक्षक सूरज गावस तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT