Minimum support price for cashew
पणजी: राज्य सरकारने काजूसाठी किमान आधारभूत (खात्रीशीर) दर १५० रुपये प्रतिकिलोवरून १७० रुपये निश्चित केला आहे. शिवाय १० हेक्टरच्या कमाल क्षेत्राचा विचार करून प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त ४ टनांपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे. काजूच्या आधारभूत किमतीत २० रुपये प्रतिकिलो वाढवून राज्यातील काजूउत्पादकांना सरकारने दिलासा दिला आहे.
यापूर्वी आधारभूत किंमत देताना काजूउत्पादन कमाल मर्यादा दोन टन वैयक्तिकरीत्या होती, तर कमाल ५ हेक्टर क्षेत्र सरकारकडून विचारात घेतले जात होते. शिवाय, आधारभूत दरामधील फरक म्हणजेच रकमेची कमाल मर्यादा १७० रुपये तर आधारभूत किमतीपेक्षा कमी खरी विक्री किंमत ५० रुपये प्रतिकिलो असेल.
राज्य सरकारने क्षेत्र योजनेत सुधारणा अधिसूचित केली आहे. नारळाच्या समर्थन मूल्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच आधारभूत दर ६ रुपये प्रतिनग आहे. तथापि, वैयक्तिक शेतकऱ्याला द्यायची कमाल खात्रीशीर किंमत ३.५ लाख रुपयांवरून ९ लाख रुपये करण्यात आली आहे. जास्तीत जास्त १० हेक्टर क्षेत्रासाठी १६०० नारळाच्या झाडांसह प्रतिलाभार्थी एक लाख नगांवर लाभ घेऊ शकतो. यापूर्वी ८०० नारळाच्या झाडांसह जास्तीत जास्त५ हेक्टर क्षेत्रासाठी ५० हजार नग असे प्रमाण सरकारने ठरविले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.