Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: डीएड अभ्यासक्रम बंद होणार! शिक्षण विभागाने सांगितले 'हे' कारण; राज्य घेणार 'एनसीईआरटी’चे मार्गदर्शन

Prasad Lolayekar: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची(एनईपी) अमंलबजावणी मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. टप्याटप्याने त्यांची सुरूवात होत असून २०२७-२८ पर्यंत बारावीपर्यंत सर्व वर्गांना एनईपी लागू होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

National Education Policy implementation In Goa DEd Course discontinued

पणजी: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची(एनईपी) अमंलबजावणी मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. टप्याटप्याने त्यांची सुरूवात होत असून २०२७-२८ पर्यंत बारावीपर्यंत सर्व वर्गांना एनईपी लागू होईल. परंतु या अमंलबजावणीत आम्हाला काही प्रश्‍न समस्या जाणवत आहेत. त्यावर तोडगा काढण्याची गरज असून आम्हाला ‘एनसीईआरटी’च्या मार्गदर्शनाची गरज आहे, असे मत शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी व्यक्त केले.

ते दरबार हॉल, राजभवन दोनपावल येथे राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने आयोजित शालेय शिक्षणाच्या परिवर्तनाचा आधार म्हणून नवीन राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. दरम्यान, लोलयेकर म्हणाले, नवीन शिक्षण धोरणात चार भाग करत इयत्ता विभागल्या आहेत. त्यातील ‘सेकंडरी लेवल’मध्ये इयत्ता नववी ते बारावी हे वर्ग येतात. ज्यामध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेतलेले शिक्षक शिकवतात, तर अकरावी बारावीला पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शिक्षक शिकवतात. परंतु नववी ते बारावी पर्यंत पदव्युत्तर शिक्षकांनीच शिक्षक असावे का ? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

डीएड अभ्यासक्रम होणार बंद!

पुढील वर्षांपासून सरकारी संस्थामध्ये शिकविण्यात येणारा डी.एड. अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यात येणार आहे. तर खासगी संस्थातील डी.एड अभ्यासक्रम अजून दोन वर्षांनी बंद होईल. २०३० पर्यंत जर हा अभ्यासक्रम सुरू ठेवल्यास बेरोजगारी वाढेल. नवीन शिक्षण धोरण डी.एड अभ्यासक्रम शिक्षक शिक्षण प्रणालीत आहेत, त्यांचे कौशल्य वाढविण्यास सांगते. परंतु ज्यांनी नव्याने हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांचे काय? याबाबत स्पष्टता नाही. ‘एनईपी’त कला शिक्षणाची अमंलबजावणी करताना संगीत, नाट्यकला, आदी विविध विषयांसाठी मोठ्या प्रमाणात आम्ही शिक्षक देऊ शकत नाही. त्यामुळे चार-पाच शाळांना मिळून आम्ही एक शिक्षक देत आहोत. त्यासाठी शाळांचे क्लस्टर तयार करण्यात आल्याचे लोलयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT