State Consumer Rights Day celebrated in Mormugao Dainik Gomantak
गोवा

मुरगावात राज्य ग्राहक हक्क दिन साजरा

नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग मुरगाव तालुका यांच्या वतीने आज राज्य ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग मुरगाव तालुका यांच्या वतीने आज राज्य ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. इशांत उसपकर उपस्थित होते.

गोवा राज्य नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग मूरगाव तालुका यांनी आज ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन वास्को येथील नागरी पुरवठा मूरगाव तालुका विभागात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. ईशान उसपकर उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर विशेष निमंत्रित अतिथी म्हणून अॅड. संदीप परब, मुरगाव नागरी पुरवठा विभागाचे निरीक्षक सरिता माेरजकर, दीपक नार्वेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे ईशांत उसपकर यांनी फेअर डिजिटल फायनान्सचे फायदे व तोटे उपस्थितांना समजावून सांगितले.

तसेच आजच्या डिजिटल युगात ग्राहकांची फसवणूक कशा प्रकारे केली जाते. यात आपण कसे जाळ्यात ओढले जातात, या विषयी उपयुक्त माहिती देऊन ऑनलाइन प्रणाली सावधगिरीने उपयोगात आणा, असा त्यांनी सल्ला दिला. यावेळी त्यांनी आपण कसे फसलो जातो याची माहिती वेगवेगळी उदाहरणे देऊन दिली.

अॅड. संदीप परब यांनीही या विषयी उपयुक्त अशी माहिती देऊन आपण डिजिटल युगात फसवणुकीपासून कसे सावरले जाऊ शकतो याची उदाहरणे देऊन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. नागरी पुरवठा मूरगाव तालुक्याच्या विभाग निरीक्षक सरिता मोरजकर यांनी राज्य ग्राहक हक्क दिनाची उपयुक्त अशी माहिती दिली व शेवटी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला मुरगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान मालक तसेच इतर नागरिकांनी उपस्थिती लावून डिजिटल फायनान्स फायदे व तोटे जाणून घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूरगाव तालुका नागरी पुरवठा विभाग उपनिरीक्षक सिद्धानंद नार्वेकर,एलडीसी राजेश साळगावकर, नामदेव नाईक, बाबुराज नाईक यांनी अथक परिश्रम घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Fights: कधी बॅट उगारली, तर कधी शिवीगाळ! 2025 मध्ये खेळापेक्षा राड्यांचीच जास्त चर्चा, कसोटी क्रिकेटमधील 10 मोठे वाद

Goa Drugs Seized: ड्रग्जमुक्त गोव्याकडे पाऊल; वर्षभरात 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त!

चिंबलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? 'युनिटी मॉल'चे काम सुरूच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; उद्यापासून उपोषण

Goa Crime: नाक दाबले अन् जीव घेतला... डिचोलीतील 'त्या' महिलेचा मृत्यू नव्हे, तर खूनच! आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

World Cup 2026 Squad: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; कोणत्या खेळाडूंना मिळाली जागा? बघा संपूर्ण संघ

SCROLL FOR NEXT