MLA KRISHNA V. SALKAR Dainik Gomantak
गोवा

''वास्को - वालंकनी रेल्वे सुरू करा''

आमदार कृष्णा साळकरांसह वास्कोच्या नागरिकांनी दिले निवेदन

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोहून वालंकनी जाणारी रेल्वे लवकर सुरू करा अशा मागणीचे निवेदन वास्कोचे आमदार कृष्णा साळकर तसेच वास्कोच्या इतर नागरिकांनी वास्को रेल्वे स्टेशन मॅनेजरला भेटविले. (Start the train from Vasco to Velankanni - Mla krishna Salkar )

गेली दोन वर्षे कोविड 19 या महामारीने ग्रासले होते. त्यानुसार देशातील दळणवळणावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. कोविड काळात अनेक व्यवसाय ठप्प झाले. यात विमान, रेल्वे, बस वाहतूकही ठप्प झाली होती. दरम्यान आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने सर्व व्यवसाय परत रुळावर येत आहे.

दरम्यान कोविड काळात रेल्वे व्यवसायही मोठ्या प्रमाणात ठप झाला होता. त्यानुसार अनेक रेल गाड्यांचे वेळापत्रक कोलमंडले होते. तसेच अनेक रेल गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी वास्कोहून वालंकनी येथे जाणारे रेल्वे सेवा गेली दोन वर्षापासून बंद करण्यात आली होती.

आता कोविडचा प्रसार कमी झाल्याने ही रेल सेवा लोकांच्या मागणीनुसार पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी रेल्वे स्थानकाचे मॅनेजर यांना भेटविले, व ही रेल सेवा लोकांसाठी परत चालू करावी अशी विनंती केली. यावेळी त्यांच्या समवेत वास्को भाजपा मंडळाध्यक्ष दीपक नाईक, नगराध्यक्ष लिओ रोड्रिक्स, नगरसेवक गिरीश बोरकर, नगरसेविका शमी साळकर, लविना डिसोजा, माजी नगराध्यक्ष फियोला रेगो व इतर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT