मडगाव: नवा पर्यटन (Tourism Session) हंगाम ऑक्टोबरच्या मध्यास दसऱ्याबरोबरच सुरू होत असून, त्याची तयारी सासष्टी तालुक्याच्या किनारपट्टीतील शॅकमालकांनी (shack owners on coast) सुरू केली आहे. यंदांचा हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. ही ते करताना दिसत आहेत.
पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी शॅक्ससाठी आखणी करून दिल्यावर काहींनी केळशी किनारी भागांत शॅक्सची हंगामी उभारणीही सुरू केली आहे. कोविड महामारीमुळे गतवर्षीचा हंगाम पूर्णतः वाया गेला होता. त्यामुळे यंदांचा हंगाम चांगला जावा, यासाठी ते आशावादी आहेत. शॅक मालक सोसायटीचे अध्यक्ष क्रुज कार्दोज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॅक्स मालकांनी जेथे जेथे पर्यटन खात्याने आखणी केली आहे तेथे शॅकांचे उभारणीचे काम सुरू केले आहे. केळशी येथे तीन ते चार ठिकाणी असे काम सुरू झाले आहे.
आकस्मात आलेल्या पावसामुळे त्या कामात व्यत्यय आला तरी ते पुन्हा सुरू होईल. सरकारने शुल्कांत 50 टक्के सवलत दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, तसेच पर्यटन मंत्री यांचे आभार मानले. त्यामुळे शॅकमालकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले. त्यांनी शुल्क भरणा जीईएल मार्फत करण्याच्या पध्दतीबद्दल मात्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अधिक अडचणी येतात, असे म्हटले आहे. परवाने शॅकांची उभारणी करण्यासाठी दिले आहेत. त्यांना नंतर काम पूर्ण झाल्यावर व्यवसाय सुरू होइल.
पर्यटक येऊ लागले
कोविड महामारीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक येऊ लागले आहेत. कोलवा, बाणावली तसेच काणकोणमधील पाळोळे व आगोंद किनारी भागात त्याचे प्रत्यंतर येत आहे; पण सरकारने अजून जलक्रीडा उपक्रमांना अजून परवानगी दिलेली नसल्याने या पर्यटकांची निराशा होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.