Madgaon Stalls Dainik Gomantak
गोवा

Madgaon : मडगावात गाडेवाल्यांकडून आदेशाला केराची टोपली!

मडगाव जुने बसस्थानक परिसरात अद्याप अनेक गाडे दिवसरात्र सुरूच

सुशांत कुंकळयेकर

Madgaon : गोवा कॅन या ग्राहक संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर मडगाव पालिकेने शहराच्या विविध भागात व प्रामुख्याने जुन्या बसस्थानकावर सायंकाळच्यावेळी ऑम्लेट पाव व अन्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाडेवाल्यांना व्यवसाय झाल्यावर गाडे तेथे ठेवण्यास मनाई केली होती, पण गाडेवाल्यांनी तो आदेश केराच्या टोपलीत टाकला आहे. त्यामुळे वीस पंचवीस गाडे तेथेच उभे करून ठेवलेल्या स्थितीत दिवसरात्र आढळून येतात.

मडगाव पालिका मुख्याधिकारी रोहित कदम यांच्या समक्ष सेनिटरी निरीक्षक विराज आरांबेकर यांनी गाडेवाल्यांना अन्न व औषध नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले होते, पण कोणीच फास्ट फूडवाला त्याची अंमलबजावणी करत नाही की पालिका यंत्रणाही त्याबाबत गंभीर आसल्याचे आढळत नाही. गेल्या दीड दोन महिन्यांत एकाही प्रकरणाची न झालेली नोंद यावरून ते स्पष्ट होते.

शहरात सायंकाळच्यावेळी अनेक भागात असे गाडे येतात व विक्री करून नंतर परत नेले जातात. मात्र, जुन्या बसस्थानकावरील तसेच कोकण रेल्वे स्थानक आके बाजूने ते तसेच ठेवले जातात व त्यामुळे तेथे अस्वच्छता माजून आरोग्य समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. नगरपालिकेने हल्लीच रेल्वे स्टेशनसमोर पदपथावर उभे केलेले दोन गाडे ते विना परवाना असल्याचा ठपका ठेवून हटविले होते, पण आता ते पुन्हा उभे ठाकल्यानेही पालिकेच्या कारवाईबाबत प्रश्न उभा राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT