St. Xavier's College Mapusa Dainik Gomantak
गोवा

'हिंदू आहे म्हणून डावलले', कारण एका बैठकीचे आणि म्हापसा येथील झेवियर महाविद्यालय पुन्हा आले चर्चेत

कधी पदस्थापना तर कधी शिवजयंती किंवा अंतर्गत राजकारण यावरून म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालय नेहमीच चर्चेत असते.

Pramod Yadav

कधी पदस्थापना तर कधी शिवजयंती किंवा अंतर्गत राजकारण यावरून म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालय (St. Xavier's College Mapusa) नेहमीच चर्चेत असते. महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने विविध आंदोलन देखील करण्यात आली आहेत. दरम्यान, झेवियर महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, आणि त्याला निमित्त ठरली आहे. एक बैठक. या बैठकीला निमंत्रण न दिल्याने महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधीने या विरोधात आवाज उठवला आहे.

झेवियर महाविद्यालयात शनिवारी (दि.01 एप्रिल) 57 वी वार्षिक क्रीडा बैठक आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या बैठवकीला हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा (Carlos Alvares Ferreira) प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार होते. दरम्यान, या बैठकीला महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी साहिल महाजन (Sahil Mahajan) याला आमंत्रण दिले नाही तसेच, कार्यक्रम पत्रिकेवर देखील त्याच्या नावाचा उल्लेख केला नाही. यावरून महाजन याने महाविद्यालया प्रशासनावर टीका केली आहे.

मी एक हिंदू असल्याने महाविद्यालयाने मला वार्षिक बैठकीचे आमंत्रण दिले नाही. मी आमदार फरेरा यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती करतो. प्रत्येक विद्यार्थ्याला समान वागणूक द्यायला हवी अशी मी मागणी करतो, आजच्या जगात भेदभावाला स्थान नाही. असे ट्विट महाजन याने केले आहे.

दरवर्षी क्रीडा दिवसाला विद्यार्थी प्रतिनिधीला बोलवले जाते पण, महाविद्यालयाने यावर्षी ही परंपरा मोडीत काढली. महाविद्यालय धार्मिक भेदभाव करत आहे. असा आरोप महाजन याने केला.

St. Xavier's College Mapusa

दरम्यान, आता याप्रकरणावरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. "विद्यार्थ्यांच्या मनात धार्मिक तेढ आणि जातीयवाद निर्माण करणे हा अभाविपचा एकमेव हेतू आहे. ते आता कॉलेज आणि एचएस स्तरावर करत आहेत. धर्मनिरपेक्ष राष्ट्रासाठी हा धोका आहे. कृपया अशा गोष्टींवर कठोर कारवाई करा." अशा शब्दात एका नेटकऱ्याने आपली भावना व्यक्त केली आहे.

गोवा भाजप प्रदेशचे नेते आणि आयटी सेलचे रूपेश कामत यांनी साहिल महाजन याच्या समर्थनात ट्विट केले आहे. "निमंत्रणपत्रिकेतच सर्व स्पष्ट दिसत आहे, महाविद्यालय प्रशासनाच्या रक्तात धार्मिक वंशवाद आणि वर्णद्वेष आहे." असे ट्विट कामत यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT