Old Goa novena  Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

St Xavier feast Old Goa: जुन्या गोव्यात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

Akshata Chhatre

Novena and Feast of St. Francis Xavier 2025: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या नोव्हेना आणि फेस्तला जुन्या गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस येथे रविवार (२३ नोव्हेंबर २०२५) पासून सुरुवात होणार आहे. दरवर्षीच नोव्हेना आणि फेस्तच्या निमित्ताने देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होतात, त्यामुळे आता देखील जुन्या गोव्यात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नोव्हेना आणि फेस्तच्या दिवसांसाठी मासच्या वेळा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत:

  • दिवस: नोव्हेना (२४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर)

  • वेळ (सकाळ): ६:००, ७:१५, ८:१५, ९:३०, ११:०० वाजता

  • वेळ (दुपार/संध्याकाळ): ३:३०, ५:००, ६:१५ वाजता

  • भाषा: ६:१५ वाजता इंग्रजीमध्ये. इतर मास कोकणीत

फेस्तचा दिवस

३ डिसेंबर २०२५ रोजी फेस्तचा दिवस (Feast Day) मोठ्या उत्साहात साजरा होईल. फेस्तच्या दिवशी मासची सुरुवात पहाटे ३:४५ वाजता होईल आणि त्यानंतर ५:००, ६:००, ७:१५ आणि ८:३० वाजता मास पार पडतील.

फेस्तच्या दिवशी महत्त्वाचा सोहळा असलेला 'सोलेमन फेस्त हाय मास' सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. दुपारनंतर मास १२:१५, ३:३०, ५:०० आणि ६:१५ वाजता (इंग्रजी) होतील. सर्व मास कोकणी भाषेत होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT