St Xavier Feast Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Feast: 'सेवा, करुणा आणि एकोप्याची प्रेरणा मिळो', फेस्तानिमित्त थेट दिल्लीतून शुभेच्छांचा वर्षाव!

St Xavier Feast Goa: या पवित्र फेस्ताच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही गोमंतकीय आणि भाविकांना खास संदेश दिले आहेत

Akshata Chhatre

St. Xavier Feast: गोव्यातील अत्यंत श्रद्धेचा आणि महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ता निमित्ताने आज (मंगळवारी) जुने गोव्यातील 'बासिलिका ऑफ बॉम जीझस' चर्चमध्ये आयोजित 'हाय मास'ला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.

'हाय मास'ला राजकीय मांदियाळी

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे उपस्थित होते. त्याचबरोबर, विरोधी पक्षनेते (LoP) युरी आलेमाव, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार कार्लोस फरेरा आणि आमदार आल्टोन डी'कोस्टा यांसारखे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेतेही या पवित्र सोहळ्याला उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांच्या या उपस्थितीने गोव्यातील सामाजिक आणि राजकीय सलोख्याचे दर्शन घडवले.

राष्ट्रीय नेत्यांकडून खास शुभेच्छा

या पवित्र फेस्ताच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही गोमंतकीय आणि भाविकांना खास संदेश दिले आहेत.

राहुल गांधी (लोकसभेतील विरोधी पक्षनेते) त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, "सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्तानिमित्त गोव्यातील प्रत्येकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. संतांचा वारसा आपल्याला एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची, असुरक्षित लोकांचे संरक्षण करण्याची आणि अधिक सर्वसमावेशक व शांततापूर्ण उद्यासाठी एकत्र काम करण्याची प्रेरणा देवो."

अरविंद केजरीवाल त्यांनी देखील 'गोंयचो सायब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांना आदरांजली वाहिली.

ते म्हणाले, "गोंयचो सायब यांची करुणा, धैर्य आणि अमर्याद प्रेम आपल्याला दुर्बळ लोकांची काळजी घेण्यासाठी आणि एकता, न्याय व सलोखा असलेले समाज निर्माण करण्यासाठी प्रेरित करो." राजकीय नेत्यांनी या धार्मिक सोहळ्यात एकत्र येऊन 'गोंयचो सायबा'चे आशीर्वाद घेतले, तसेच संतांच्या मानवतावादी संदेशाला पाठिंबा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT