St. Xavier's Exposition Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला केवळ दोन दिवस बाकी; यात्रेकरूंच्या राहण्याची, पार्किंगची तयारी कुठवर आली?

Exposition Goa Preparations: पाहूया दोन दिवसांवर येऊन ठेवपलेल्या उत्सवाची एकूण तयारी कुठवर आली आहे...

Akshata Chhatre

जुने गोवे: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शनाला आता काही काळ बाकी राहीला आहे. या दरम्यान येणाऱ्या सर्व भाविकांची तसेच पर्यटकांची व्यवस्था नीट व्हवी म्हणून समिती आणि राज्य सरकार दोन्ही प्रयत्नशील आहेत. सध्या गोव्यात प्रदर्शन समिती, पोलीस यंत्रणा आणि सरकार वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतलेलं पाहायला मिळतंय. आता जवळपास सगळीच कामं पूर्ण झाली असून काही अंतिम टप्प्यातील कामं बाकी आहेत. चला मग पाहूया दोन दिवसांवर येऊन ठेवपलेल्या उत्सवाची एकूण तयारी कुठवर आली आहे...

शव प्रदर्शनाच्या वेळी आलेल्या सर्व यात्रेकरूंची व्यव्यथा सेंट जोसेफ वाझ रीन्युअल सेंटर, पेस्टॉरल इंस्टीट्यूट , से कॅथेड्रल येथे करण्यात येणार आहे. याशिवाय चर्चपासून काही किलोमीटर अंतरावर पिलग्रिम व्हिलेजची उभारणी करण्यात आली असून यामध्ये 200 लोकांच्या राहण्याची सहज व्यवस्था केली जाईल, हे कॉटेज उभारण्याचं काम सुरु आहे.

पार्किंगचा विचार करायचाच झाला तर भाकीया प्रॉपर्टीवर पार्किंगची सोय केली जाणार आहे. या ठिकाणी दिव्यांग किंवा इतर आजरी लोकं देखील गाड्या पार्क करू शकतात.शिवाय चर्चच्या मागच्या बाजूला असलेली जागा पाद्री आणि इतर धर्मांगुरूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याजागेत कॉयर गायक देखील त्यांच्या गाड्या उभ्या करू शकतील.

सामान्य लोकांना या जागेत गाडी लावता येणार नाही हे मात्र लक्ष्यात घेतलं पाहिजे. शिवाय सांता मोनिका कॉन्व्हेंट येथील चर्चच्या आवारात सामान्य लोकांना गाडी पार्क करता यावी म्हणून तयारी सुरु आहे.

यावेळी चर्चमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी टॉयलेटची सेवा देखील दिली जाणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या मान्यतेनुसार एका ठरविक जाग्यांवर काही टेम्पररी शौचालये बांधली जातील आणि सोहळा समाप्त झाल्यानंतर ही शौचालये काढण्यात येतील.

सेंट झेवियर यांच्या सोहळ्यात सामील होणाऱ्या प्रत्येकाला रांगेत उभं राहून दर्शन घेणं भाग आहे. इथे कुठल्याही प्रकारचे बुकिंग उपल्बध करून दिले गेले नसल्याची माहिती आयोजन समितीचे सदस्य फादर फाल्काओ यांनी दिली. मात्र दिव्यांग लोकांसाठी तसेच वृद्ध माणसांसाठी विशेष व्यव्यस्था केली जाईल असेही ते म्हणालेत. ज्या भाविकांना चर्च बद्दल एकूण माहिती जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी कॅथोलिक कनेक्ट ॲप डाऊनलोड करावे, कारण यामधूनच त्यांना ऑडिओमधून एकूणच माहिती दिली जाईल.

सेंट झेवियर यांच्या शव प्रदर्शन कार्यक्रमात एकूण 62 कलाकार त्यांच्या कलेच्या मध्यमातून संत झेवियर यांचा जीवनप्रवास उलघडून दाखवणार आहेत.

आत्तापर्यंत बॅसिलिका जवळ उभारण्यात आलेल्या पंडालचे काम जवळपास पूर्ण झाले असून इथे अनेक सुविधा उभारल्या जातील. इथे जर्मन हँगरदेखील उभारण्यात आलाय आणि एकंदरीतच गोवेकरांच्या मनात येत्या प्रदर्शनाचा उत्साह पाहायला मिळतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT