Old Goa Exposition Ceremony: Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: ओल्ड गोव्यात शव प्रदर्शनाला सुरुवात; मुख्यमंत्री आणि राज्यपालांची हजेरी

Old Goa Exposition Ceremony: या सोहळ्यात गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री माविन गुदिन्हो देखील उपस्थित राहणार आहेत

Akshata Chhatre

Saint Francis Xavier Exposition Old Goa Church

ओल्ड गोवा: गेल्या अनेक दिवसांपासून देश विदेशातील भाविक आणि यात्रेकरू ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते तो सोहळा म्हणजेच संत फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेष प्रदर्शन सोहळयाला गुरुवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून या सोहळ्याची तयारी सुरु होती आणि आता दिल्लीचे प्रमुख बिशप अनिल कौटो यांनी बॉम जिझसच्या चर्चमध्ये युकेरिस्टिक उत्सवासह या सोहळ्याला सुरुवात केली आहे.

या सोहळयात फादर फेलिप नेरी यांच्यासह इतर 10 बिशप प्रमुख बिशप अनिल कौटो यांचे सहकार्य करणार आहेत. तसेच जवळपास 50 संगीतकार आणि गायकांचा समावेश असलेले गानवृंद फादर रोमियो मॉन्टेरो यांच्यासह उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाला आहे. 21 नोव्हेंबर पासून सुरु झालेला हा पवित्र शव प्रदर्शनाचा सोहळा पुढे 45 दिवस चालणार असून 5 जानेवारी रोजी याचा समारोप सोहळा होणार आहे.

दरम्यान संत फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त देखील 3 डिसेंबर रोजी साजरे केले जाईल. गुरुवारी सुरु झालेल्या या सोहळ्यात गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री माविन गुदिन्हो हे देखील उपस्थित राहणार आहेत.

गुरुवारी जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषांच्या 18व्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला पाच देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी बातमी समोर आली आहे. द होली सी, पेरू, अर्जेंटिना, कोलंबिया आणि सोलोमन बेटांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा केली जात आहे. सकाळी होणाऱ्या मासनंतर ते से कॅथेड्रलमधील पवित्र अवशेषांची पूजन करतील असेही म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier History: स्पेनच्या राजघराण्यात जन्म, आयुष्यभर धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या संत फ्रान्सिस झेवियर यांचा इतिहास

Goa Today's Live Updates: पर्यावरणीय मान्यता देण्यास प्राधिकरणाचा नकार, कायदेशीर रेती उत्खननाला होणार पुन्हा विलंब!

IFFI Goa 2024: इफ्फी प्रतिनिधींसाठी खास इलेक्ट्रीक बससेवा, रिक्षाचीही मोफत सोय; जाणून घ्या रुट

Saint Francis Xavier Exposition: 10 वर्षानंतर पहिल्यांदाच समोर आले संत फ्रान्सिस झेवियर यांचे शव; पाहा पहिली झलक

IFFI Goa 2024: "केवळ पैसा असला म्हणजे चित्रपट बनवता येत नाही"; शेखर कपूर असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT