Hatkatro Khambo And St. Inez Kadamba Heritage Relic Dainik Gomantak
गोवा

हात कातरो खांबाला दिला पिवळा रंग तर कदंब काळातील अवशेष दुर्लक्षित

राज्यातील या ऐतिहासिक ठेव्यांकडे सरकार आणि पुरातत्व खात्याचे लक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Pramod Yadav

गोव्यात अनेक ऐतिहासिक वारसास्थळ आहेत. इतिहास, पर्यटनाच्या दृष्टीकोनातून त्याला मोठे महत्व आहे. पण राज्यातील या ऐतिहासिक ठेव्यांकडे सरकार आणि पुरातत्व खात्याचे लक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हात कातरो खांबाला अज्ञाताने पिवळा रंग दिलाय तर सांतिनेज येथील कदंब काळातील अवशेष दुर्लक्षित असल्याने त्याची स्थिती दयनीय झाली आहे.

Hatkatro Khambo In Old Goa

प्राध्यापक प्रजल साखरदांडे यांनी याप्रकरणी दोन वेगवेगळ्या पोस्ट फेसबुकवरती शेअर केल्या आहेत.

पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी ओल्ड गोवा येथील हात कातरो खांबाला अज्ञाताने पिवळा रंग देऊन विद्रुपीकरण केल्याचे म्हटले आहे. ऐतिहासिक महत्व असलेल्या खांबाचे अशापद्धतीने विद्रुपीकरण केल्याप्रकरणी त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

तर, दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी सांतिनेज येथील कदंब काळातील अवशेषाचा फोटो शेअर केला आहे. यात त्या अवशेषावर माती पसरली असून, ऊसाचा तुकडा उभारण्यात आला आहे.

St. Inez Kadamba Heritage Relic

हात कातरो खांबाला दिलेल्या पिवळ्या रंगाचा नागरिकांनी निषेध केला आहे. असे कृत्य करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी लोकांनी पोस्टवर मत व्यक्त करताना केली आहे.

तसेच, सरकारचे देखील याकडे दुर्लेक्ष होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT