Blind Devotees St Xavier Exposition Prayer Old Goa Dainik Gomantak
गोवा

Saint Xavier Exposition: पवित्र अवशेष दर्शन सोहळ्यात देशभरातील दृष्टिहीन भाविकांची प्रार्थना; जुने गोवेत प्रथमच विशेष सभा

Blind Devotees St Xavier Exposition Prayer: सेंट फ्रांसिस झेवियर पवित्र अवशेष दर्शन सोहळ्यात यंदा प्रथमच दृष्टिहीन भाविकांसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Sameer Panditrao

Blind Devotees St Xavier Exposition Prayer Old Goa

पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी येशूवर असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे अनेक लोकांना येशूच्या जवळ आणले. आजही ५०० वर्षांनंतरही, अनेक भाविक त्यांच्याप्रति आदर आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी जुने गोवे येथे आले आहेत. आपण सर्वजण या तीर्थयात्रेमध्ये एकत्र काम करत आहोत आणि प्रवास करत आहोत, असे उद्‍गार फादर हेन्री फल्काव यांनी काढले.

सेंट फ्रांसिस झेवियर पवित्र अवशेष दर्शन सोहळ्यात यंदा प्रथमच दृष्टिहीन भाविकांसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही प्रार्थना सभा जुने गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर ट्रेनिंग कम प्रॉडक्शन सेंटरमध्ये झाली. फादर फाल्काव या प्रार्थना सभप्रमुख होते.

फादर मॅव्हरिक फर्नांडिस (डायरेक्टर, कारितास गोवा), फादर सॅविओ फर्नांडिस (कार्यकारी सचिव, काउन्सिल फॉर सोशल जस्टिस अँड पीस), आणि फादर वॉल्टर डिसोझा (इंचार्ज, एसएफएक्स ट्रेनिंग कम प्रॉडक्शन सेंटर, जुने गोवा) यांनी प्रार्थना सभेत सहकारी म्हणून भाग घेतला.

या प्रार्थना सभेत गोवा तसेच महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, आणि हिमाचल प्रदेश येथून आलेले सुमारे ८५ दृष्टिहीन भाविक आणि त्यांचे साहाय्यक सहभागी झाले होते. फादर मॅव्हरिक फर्नांडिस यांनी दृष्टिहीन भाविकांचे आणि त्यांच्या सोबत्यांचे स्वागत केले.

ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनचे संयोजक मिलाग्रेस कोस्टा, जे दृष्टिहीन असून सध्या यूकेमध्ये कार्यरत आहेत, त्यांनी दृष्टिहीन भाविकांसाठी विशेष मिस्सा आयोजित केल्याबद्दल कारितास गोवाचे आभार मानले. फादर सॅविओ फर्नांडिस यांनी आभार मानले.

भाविक, पर्यटकांची गर्दी

दर दहा वर्षांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांचे सार्वजनिक दर्शन घडवले जाते. या वर्षीच्या सोहळ्याला भाविक, प्रवासी आणि पर्यटकांची मोठी गर्दी होती. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतासह पोर्तुगाल, स्पेन, इटली, जपान, फिलिपाइन्स, आणि आफ्रिकेतील अनेक देशांमधून लोक गोव्यात आले. सोहळ्याच्या निमित्ताने चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये प्रार्थना सभा, विशेष प्रवचनांचा समावेश होता.

विविध भाषांमध्ये प्रार्थना

भाविकांच्या सोयीसाठी प्रार्थना सभा इंग्रजी, पोर्तुगीज, कोंकणी, हिंदी, मराठी, आणि अन्य स्थानिक भाषांमध्ये पार पडल्या. यामुळे भाविकांना आपल्या भाषेत प्रार्थनेत सहभागी होण्याची संधी मिळाली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांची मिरवणूक प्रमुख आकर्षण ठरली. मिरवणुकीत लोक पारंपरिक पोशाखात सहभागी झाले. भाविकांनी त्यांच्या श्रद्धेनुसार मेणबत्त्या लावल्या, प्रार्थना केली, आणि सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या आशीर्वादाची याचना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT