old goa church 
गोवा

सेंट फ्रांसिस झेवियरची शवपेटी दुरूस्तीसाठी इटलीला

Dainik Gomantak

पणजी

जुनेगोवे येथील बासालिका ऑफ बॉम जीजस या चर्चमध्ये असलेली सेंट फ्रांसिस झेवियर यांचे शव जतन करून ठेवलेली शवपेटी दुरूस्तीसाठी इटलीला पाठवण्यात येणार आहे. शव काचबंद पेटीत असल्याने ते ही शवपेटी येईपर्यंत दुसऱ्या पेटीत सुरक्षित ठेवले जाणार आहे. चर्चचे रेक्टर फादर पॅस्ट्रीसिओ फर्नांडिस यांनी ही माहिती दिली.
त्यांनी नमूद केले की सेंट फ्रांसिस झेवियर यांचे शव इटलीला पाठवू नका अशा अनेक विनंत्या केल्या जात आहेत, मात्र हा गैरसमज आहे. केवळ शवपेटी दुरुस्तीसाठी पाठवली जाणार आहे. १९५४ मध्ये शव काचेच्या पेटीत ठेवण्यात आले तेव्हापासून ते तशेच आहे. केवळ दहा वर्षांनी होणाऱ्या शवदर्शन सोहळ्यासाठी काचेची पेटी शवपेटीतून काढून ४५ दिवस से कॅथेड्रलमध्ये ठेवण्यात येते.
सध्या चर्चची दुरुस्ती सुरु आहे. यानिमित्ताने साफसफाई करण्याचा सल्ला देण्यात येऊ लागला. मात्र त्याचा तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे होते. मला एका व्यक्तीने सांगितले, की १९९६ मध्ये इटलीतील काही कारागिरांनी दुरूस्तीकाम केले होते. इटलीतील कारागिर आताही आणण्याची तयारी केली. ते आले पाच दिवस राहिले त्यांनी लेखी मार्गदर्शनही केले. शवपेटी एक वर्षासाठी इटलीला पाठवा तेथेच ती दुरुस्त करण्यासाठीची हत्यारे आहेत असे त्यांनी सांगितले. पुरातत्व खाते याला तयार नाही, ते येथेच शवपेटी दुरूस्त करा असे ते सांगतात. पुरातत्व खात्याकडे पैसे नाहीत,तंत्रज्ञान नाही, असे त्यांनी नमूद केले.

Goa Goa Goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT