Missing Bashudev Bhandari  Canva
गोवा

Saint Estevam Accident: 'बाशुदेव' प्रकरण घातपात की अपहरण? पाणबुडे, ड्रोनच्या साहाय्याने पुन्हा अयशस्वी शोधमोहीम

St Estevam Tragedy: नौदलाचे पाणबुडे तसेच पोलिस व अग्निशमन दलाच्या संयुक्त विद्यमाने दिवसभर ड्रोन तसेच पाण्याखाली कॅमेऱ्याने शोध घेण्यात आला मात्र त्यात यश आले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam Car Plunged Into Cumbarjua River Missing Bashudev Case

पणजी: सांतइस्तेव्ह बेटावरील आखाडा येथील फेरी धक्क्यावर महिन्यापूर्वी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या बाशुदेव भंडारी याचा शोध घेण्याची मोहीम सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. नौदलाचे पाणबुडे तसेच पोलिस व अग्निशमन दलाच्या संयुक्त विद्यमाने दिवसभर ड्रोन तसेच पाण्याखाली कॅमेऱ्याने शोध घेण्यात आला मात्र त्यात यश आले नाही. या नदीपात्रात यापुढेही देखरेख व बोटीने शोधमोहीम सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली.

ही घटना घडल्यापासून जुने गोवे पोलिसांनी सर्व प्रकारे या प्रकरणाचा तपास करून बेपत्ता असलेल्या बाशुदेव भंडारी याचा शोध व तपास करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नौदल पाणबुडे याची अगोदरही मदत घेण्यात आली होती. सोमवारी नव्याने पुन्हा एका शोध मोहीम सुरू करताना नौदलाच्या पाणबुड्यांनी तेथील खारफुटी असलेल्या अडगळीतही पाण्याखाली जाऊन शोध घेतला. पाण्याखाली काही मोठ्या झाड्यांचे खोड असलेल्या ठिकाणी मृतदेह अडकला आहे का याचाही तपास केला. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही शोधमोहीम संध्याकाळी पाचच्या सुमारास थांबवण्यात आली.

घटनेनंतर बाशुदेव याचे वडील व भाऊ गोव्यात आले होते. त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन स्वतः चौकशी करून माहिती गोळा केली. बाशुदेव भंडारी व त्याची मैत्रीण गेली होती तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील माहिती मिळवूनही पोलिसांनी चौकशी केली होती.

घातपात की अपहरण ?

बाशुदेव भंडारी याचा शोध लागत नसल्याने त्याचा घातपात की अपहरण झाले आहे, याबाबत पोलिसही निष्कर्षाप्रत पोहचू शकत नाही. बाशुदेव भंडारी याच्या मैत्रिणीने दिलेल्या जबानीबाबत भंडारी कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्याने पुन्हा तिची जबानी नोंद करण्यात आली होती. त्या रात्री भंडारी याच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या तरुणांनाही अटक करून त्यांची जबानी नोंदवली मात्र त्यातूनही काही ठोस माहिती समोर आली नाही. जोपर्यंत भंडारी याचा शोध लागत नाही तोपर्यंत तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला याबाबत काहीच सांगता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले.

शोध मोहिमेत वडील, भाऊही सहभागी

या शोध मोहिमेवेळी बाशुदेव भंडारी याचे वडील तसेच भाऊ हे उपस्थित होते. त्यांनीही नौदल व पोलिसांच्या बोटीतून तपास सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र त्यांचीही निराशा झाली. दिवसभर ते शोधमोहीम पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांसोबत या फेरी धक्क्यावर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT