Goa ST Community Reservation:  Dainik Gomantak
गोवा

Goa ST Community Reservation: भाजपमुळे आमच्यावर आरक्षणासाठी उपोषण करण्याची वेळ; ‘एसटी’ नेत्यांचा आरोप

‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’च्या नेत्यांनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ

Akshay Nirmale

Goa ST Community Reservation: राजकीय आरक्षण हा आमचा संविधानिक अधिकार आहे. मात्र आमचा हा अधिकार देण्यास भाजप सरकार तयार नाही.

आमचा अधिकार आम्हाला मिळावा यासाठी आज आमच्यावर उपोषण करण्याची वेळ आली आहे, ही वेळ भाजप सरकारमुळे आली आहे, असा आरोप ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’च्या नेत्यांनी आज केला.

राजकीय आरक्षणासह अन्य मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या पुण्यतिथी दिनी आज या नेत्यांनी मडगाव येथील लोहिया मैदानावर एका दिवसाचे उपोषण केले.

त्यात ज्येष्‍ठ एसटी नेते गोविंद शिरोडकर यांच्यासह उपासो गावकर, कांता गावडे, रामकृष्ण जल्मी, जोसेफ व्‍ही. व अन्य नेत्यांचा समावेश होता.

या सरकारने आमचा फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. आमच्या 12 मागण्यांपैकी एकही मागणी पूर्ण केलेली नाही. आमचे घटनादत्त अधिकार आम्हाला मिळावेत यासाठी सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत, असे गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

SCROLL FOR NEXT