SSC exam Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आजपासून दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु

राज्यातील जवळपास 400 परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात दहावी आणि बारावीची परीक्षा आजपासून सुरु झाली आहे. दहावीच्या परीक्षा 20 हजारांहून अधिक विद्यार्थी देणार असून, 18 हजारांहून अधिक विद्यार्थी बारावी बोर्डाची परीक्षा देत आहेत. राज्यातील जवळपास 400 परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यात अजूनही कोरोनाचे (Corona) रुग्ण सापडत असल्याने परीक्षेदरम्यान कोरोना नियमावलीचं पालन करणं विद्यार्थ्यांना सक्तीचं कऱण्यात आलं आहे. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना गणितासह विज्ञानाच्या पेपरसाठी 15 मिनिटे जास्तीचा वेळ मिळणार आहे. ऑनलाईन क्लासेसमुळे विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव नसल्याचं सांगत ही जास्तीची वेळ देण्यात आल्याचं बोर्डाकडून स्पष्ट कऱण्यात आलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. हे दोन विषय वगळता अन्य विषयांना मात्र नेहमीप्रणाणेच वेळेची मर्यादा देण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राची परीक्षा (Examination) याआधीच झाली असून या दुसऱ्या सत्राच्या निकालानंतर दोन्ही परीक्षांच्या आधारे निकाल दिला जाणार आहे.

राज्यात सुमारे 400 केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून यातील 106 केंद्रांवर बारावीची परीक्षा घेतली जाणार असून 18,215 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत, अशी माहिती गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांच्याकडून देण्यात आली आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची (Student) संख्या तुलनेने जास्त असून 20,594 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून यात 10,530 मुलं तर 10,055 मुलींचा समावेश आहे. बारावीसाठी 8,937 विद्यार्थी तर 9,278 विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. ज्या शाळांमध्ये 100 हून कमी विद्यार्थीसंख्या असेल अशा विद्यार्थ्यांची सोय जवळच्या केंद्रात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test: भारत-श्रीलंका टेस्टचा थरार निर्णायक वळणावर! अखेरच्या दिवशी शुभमन गिलसमोर मोठं आव्हान, विजयासाठी काय असेल रणनीती?

Horoscope: ग्रहांची साथ मिळणार अन् आर्थिक स्थिती सुधारणार! मेष-तुळ राशीला लाभाचे संकेत, मिथुनसह 'या' राशींनी मोठे निर्णय टाळावेत

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

SCROLL FOR NEXT