Mallikarjuna Temple Dainik Gomantak
गोवा

Mallikarjuna Temple: श्रीस्थळ श्री मल्लिकार्जुन देवाचा समुद्रस्नान सोहळा उत्साहात

भक्तीमय वातावरण ः राजबाग तारीर येथे उसळली भाविकांची गर्दी

दैनिक गोमन्तक

Mallikarjuna Temple: अलोट भक्तांच्या उपस्थितीत श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवाचे आज राजबाग-तारीर येथे समुद्र स्नानाचा विधी पार पडला.

शिवरात्री नंतर देवाची पालखी वाजतगाजत वाटेत भाविकांच्या भेटी स्वीकारत राजबाग-तारीर येथे समुद्र स्नानासाठी आणली जाते.यावेळी राजबाग- तारीर समुद्र किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित असल्याने समुद्र किनाऱ्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.

शिवरात्रीनंतर शिमगोत्सवाचे वेध लागत असल्याने पारंपारिक शिमगोत्सवासाठी लागणाऱ्या तोणयो व रंगबेरंगी फुलांनी सजवलेले मुंडासे या वेळी देमानी बाळ्ळी येथील चितारी विक्रीसाठी घेऊन येत असतात.त्याशिवाय देवाला अर्पण करण्यासाठी लागणाऱ्या केळींचा बाजारच किनाऱ्यावर भरलेला असतो.

देवाचे समुद्र स्नान झाल्यानंतर भाविक पवित्र स्नान करतात. यंदा सकाळी पहाटे 5 वाजता श्रींचे चांदीच्या पालखीतून मंदिराकडून समुद्रस्नानासाठी राजबाग तारीर समुद्रकिनाऱ्यावर प्रयाण झाले. पालखीबरोबर ब्राह्मण, वांगडी, वेळीप, महाजन, सेवेकरी, वाजंत्री व भक्तगणांचा लवाजमा असतो.

वाटेत ठराविक ठिकाणी सुवासिनींकडून श्रींची ओवाळणी केली जाते. समुद्र किनाऱ्यावर महासमुदायाच्या उपस्थितीत श्रींचा समुद्रस्नान विधी पार पाडला जातो. भाविक समुद्रस्नान करून श्रींचे पालखीतून मंदिरात पुनरागमन होत असते. त्यानंतर पूजा अर्चा झाल्यानंतर उपस्थितांना प्रसाद वाटप केले गेले.

आज ठरणार अवताराचा कार्यक्रम !

मंगळवार (ता. 21) संध्याकाळी पेन्नोटीतील गांवपण होईल व तिथे काणकोण भागातील श्री अवतारपुरुष देवाच्या अवताराचा कार्यक्रम ठरविला जाईल,अशी माहिती देवालय समितीचे अध्यक्ष विठोबा म. देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT