National Games 2023 Goa: 37 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी अनुसूचित जमाती, ओबीसी आणि ख्रिस्ती समाजाचा अपमान करण्यासाठीच क्रिडामंत्री गोविंद गावडे, केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक आणि फ्रांसिस सार्दिन यांना स्वयंपूर्ण फेरीतून वगळले असा आरोप काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमूख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
'राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी नेहरू स्टेडियमवर एका होडी सारख्या दिसणाऱ्या वाहनांतून केलेल्या परेडवर टिका करताना अमरनाथ पणजीकर यांनी, पंतप्रधानांच्या सूचनेवरूनच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे लज्जास्पद कृत्य केले आहे,' असा दावा केला.
'भाजप सरकार कॅथलिक आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना नेहमीच सापत्न वागणूक देते. खलाशी पेंशन योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी कॅथोलिक समुदायाचे असल्याने सदर योजना कायमस्वरूपी म्हणून जाणीवपूर्वक अधिसूचित केलेली नाही,' असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.
'माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा हे कॅथलिक असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत जाण्यास भाजपने दिले नाही. भाजपने कॅथलिकांचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला आणि नंतर त्यांना नाकारले,' असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
'गोव्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन खासदारांना स्वयंपूर्ण फेरीत का समावून घेतले नाही व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांचीच निवड का करण्यात आली यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना स्पष्टीकरण द्यावे,' अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.