Govind Gaude|Sports Authority Of Goa|Sports Award Dainik Gomantak
गोवा

Sports Award: खेळ पैशांसाठी नसून गोव्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आहे; क्रीडामंत्री गावडे

Sports Authority Of Goa: २८७ खेळाडूंना आर्थिक बक्षिसांचे वाटप; एकूण २ कोटी ६८ लाख रुपयांची बक्षिसे सरकारकडून देण्यात आली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आपल्या आयुष्यात येणाऱ्या टीका, वाद आव्हानांना सामोरे जात अंगावर येणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला क्रीडापटू शिंगावर घेतो त्यावेळीच तो खरा चॅम्पियन ठरतो, असे प्रतिपादन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले. कला अकादमी येथे क्रीडा प्राधिकरणाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

गावडे पुढे म्हणाले, की ३७ व्या स्पर्धेत तुम्ही पदके मिळवली म्हणजे आता कार्य संपले असे नाही, तर आता खऱ्या अर्थाने क्रीडा जीवन प्रवासाला सुरवात झाली आहे याची जाणीव ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे. अनेक खेळाडू ज्यावेळी स्पर्धा असतात त्यावेळीच सराव करतात, परंतु स्पर्धा असो वा नसो सराव सुरू ठेवणे गरजेचे आहे. ज्यावेळी क्रीडापटू आपले कलागुण दाखवतील त्यावेळीच सरकार मदत करू शकते.

जर आपण आपल्याला सिद्ध करत नाही, तोपर्यंत मान्यता मिळत नाही. आपल्यावर होणाऱ्या टीका, वादांवर लक्ष न देता आपल्याला जे यश प्राप्त करायचे आहे त्यावर लक्ष ठेवा. यासाठी मनावर ताबा ठेवत आपण पुढे जात राहणे गरजेचे आहे. ज्यावेळी आपल्याला यश मिळणार असे जाणवते, त्यावेळी अनेकजण पाय ओढतात, परंतु यश प्राप्तीनंतर तेच पहिल्यांदा नतमस्तक होतात हे ध्यानात ठेवून कार्य करा.

‘पैशांसाठी नव्हे, गोवा आणि देशासाठी खेळा’

राज्यातील आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या २८७ खेळाडूंना आर्थिक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. एकूण २ कोटी ६८ लाख रुपयांची बक्षिसे सरकारकडून देण्यात आली आहेत. या क्रीडा प्रकारातील खेळांडूनाही प्रोत्साहन देणे हे कर्तव्य समजून त्यांनी ५० टक्के आर्थिक मदतीची बक्षिसे देण्यात आली आहेत. खेळ हा पैशांसाठी खेळण्यासाठी नसून गोव्याचे आणि आपल्या भारत देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळणे गरजेचे असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT