Goa Shipyard Dainik Gomantak
गोवा

Goa Shipyard: गोवा शिपयार्ड आयोजित एचआर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

संरक्षण, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या 16 एचआर प्रमुखांचा समावेश होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shipyard बदलती मनुष्यबळ विकास धोरणे आणि प्रक्रियांबाबत जागरूक राहण्याच्या उद्देशाने गोवा शिपयार्डने आयोजित केलेल्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या एचआर मेळाव्याला चांगला प्रतिसाद लाभला.

गोवा शिपयार्डच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या 16 एचआर प्रमुखांचा समावेश होता.

यामध्ये नव्याने तयार झालेले आयुध निर्मिती मंडळाचे एचआर सहभागी झाले होते. या एचआरमध्ये ज्ञानाची व सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

या मेळाव्याला प्रमुख पाहुणे या नात्याने नौदलाचे कमोडोर पी. आर.हरी (निवृत्त) यांच्यासह गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, संचालन कॅप्टन जगमोहन, संचालक सुनील एस. बागी, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वक्त्यांनी आस्थापनांना पुढे नेण्यासाठी व सक्षम शक्ती म्हणून सध्याच्या व्यवसायाच्या परिस्थितीत एचआरच्या योग्यतेवर भर दिला. विविध कार्यक्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अंतर कमी करण्यासाठी एचआरची भूमिका मोठी असते, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी विविध विषयावर विचारमंथन सत्र घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT