Goa, Ramnath Temple Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटन खात्याकडून 'एकादश तीर्थ सर्किट' उपक्रम सुरु, 11 मंदिरांचा समावेश; धार्मिक पर्यटनाला सरकार देतेय प्रोत्साहन

Ekadash Tirth Circuit In Goa: धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन खात्याने ‘एकादश तीर्थ सर्किट’ उपक्रम सुरू केला आहे. या योजनेत राज्यातील ११ पवित्र मंदिरे समाविष्ट करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्याच्या अंतर्गत भागातील पर्यटनाच्या वृद्धीसाठी सरकार कटिबद्ध असल्याच्या घोषणा करते मात्र, कृती होत नाही, अशा प्रतिक्रिया पर्यटन क्षेत्रातील घटकांतून उमटत आहेत. दरम्यान, धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन खात्याने ‘एकादश तीर्थ सर्किट’ उपक्रम सुरू केला आहे. या योजनेत राज्यातील ११ पवित्र मंदिरे समाविष्ट करण्यात आली असून, पर्यटकांना अध्यात्मिक अनुभव देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

या सर्किटमधील मंदिरांच्या व्यवस्थापन समित्यांसोबत पर्यटन खात्याने सक्रिय संवाद साधला आहे. यामध्ये मंदिरे (Temple) आणि परिसराचा पायाभूत विकास, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन, तसेच पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘एकादश तीर्थ सर्किट’ योजना देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध व्यापार मेळावे आणि प्रचार कार्यक्रमांत सादर करण्यात आली आहे. या योजनेमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल,असे विभागाने स्पष्ट केले आहे.

‘समुद्रापलिकडचा गोवा’

याशिवाय, सरकारने (Government) ‘समुद्रापलीकडे गोवा’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत अंतर्भागीय पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन सर्किट्स, तसेच स्थानिक समुदायांशी निगडित पर्यटन उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमांमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात नवे आयाम उभारले जात असून, राज्याच्या अंतर्भागातील नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा अधिक चांगल्या पद्धतीने पर्यटकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT