spicejet Flight To Goa Dainik Gomantak
गोवा

Flight To Goa: स्पाइसजेट सुरत -पुणे- गोवा विमानसेवा सुरु करणार, पुढच्या महिन्यात पहिले उड्डाण

स्पाइसजेट कंपनी 1 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सुरत-पुणे-गोवा आणि गोवा-सुरत अशी विमान उड्डाण सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Flight To Goa: स्वस्तात हवाई वाहतूक सेवा पुरवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेली स्पाइसजेट एअरलाइन्स आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासह सुरत विमानतळावरून पुन्हा ऑपरेशन सुरू करण्याच्या तयारीत आहे.

स्पाईसजेट सुरत विमानतळावर रात्रीच्या विमान पार्किंग सुविधेसह नवीन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती एका स्थानिक वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे.

स्पाईसजेटने सुरत-जयपूर फ्लाइटसाठी स्लॉट मंजूर केले आहेत. एअरलाइनने सुरत, मुंबई, उत्तर गोवा, अहमदाबाद, पुणे, नाशिक, राजकोट, शिर्डी, भावनगर, दीव आणि खजुराहो स्टेशनसाठी ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह आणि सिक्युरिटीची भरती सुरू केली आहे.

कंपनी सीआरजे आणि एटीआर श्रेणीची 72 ते 76 आसनी विमानांची पुन्हा उड्डाण सेवा सुरु करण्याची शक्यता आहे.

स्पाइसजेट कंपनी 1 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सुरत-पुणे-गोवा आणि गोवा-सुरत अशी विमान उड्डाण सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.

सुरत-पुणे-गोवा विमान सुरतहून पुण्यासाठी सकाळी 6.20 वाजता उड्डाण करेल. हे विमान 16.20 वाजता गोव्याहून सुरतला पोहोचेल, 17.00 वाजता सुरतहून गोव्यासाठी निघेल आणि 21.10 वाजता सुरतला पोहोचेल.

उडान योजनेंतर्गत, इंडिगो एअरलाइन्स 29 ऑक्टोबरपासून सुरत-दीव-सुरतला जोडणारी उड्डाणे सुरू करणार आहेत. एअरलाइन्स पहिल्या टप्प्यात सुरत-पुणे, सुरत-जयपूर आणि सुरत-गोवा अशी थेट उड्डाणे सुरू करू शकतात. 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान पुणे आणि जयपूर येथून सुरू होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT