Special Trains For Velankanni Onam Dainik Gomantak
गोवा

Special Trains For Velankanni Onam: वालांकिनी फेस्त, ओनम उत्सवानिमित्त धावणार रेल्वेच्या खास प्रवासी गाड्या

वालांकिनी फेस्त व ओनम उत्सव काळात दक्षिण पश्र्चिम व दक्षिण रेल्वेने खास प्रवासी गाड्यांची व्यवस्था केली आहे.

दैनिक गोमन्तक

Special Trains For Velankanni Onam: वालांकिनी फेस्त व ओनम उत्सव काळात दक्षिण पश्र्चिम व दक्षिण रेल्वेने खास प्रवासी गाड्यांची व्यवस्था केली आहे. वास्को ते वालांकिनी व परत-०७३६१ क्रमांकाची गाडी वास्कोहून रविवारी, शुक्रवारी व बुधवारी म्हणजे २७ ऑगस्ट, १ व ६ सप्टेंबर या दिवसात रात्री ९वाजून ५५ मिनिटांनी सुटेल व तिसऱ्या दिवशी वालांकिनिला पहाटे ३.५० वाजता पोहचेल.

त्याच प्रमाणे ०७३६२ क्रमांकाची गाडी वालांकिनीहून रात्री १.२० वाजता बुधवार, सोमवार व शनिवारी म्हणजे ३० ऑगस्ट, ४ व ९ सप्टेंबर या दिवशी सुटेल व वास्कोला दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पोहचेल. ही गाडी गोव्यात मडगाव, सावर्डे कुडचडे, कुळे, कॅसलरॉक या स्थानकांवर थांबेल.

नागरकोईल ते पनवेल व परत - ०६०७१ क्रमांकाची गाडी नागरकोईलहून सकाळी ११.३५ वाजता दर मंगळवारी म्हणजे २२ व २९ ऑगस्ट व ५ सप्टेंबर या दिवशी सुटेल व पनवेलला दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता पोहचेल.

त्याच प्रमाणे ०६०७२ क्रमांकाची गाडी पनवेलहून दर गुरुवारी म्हणजे २४ व ३१ ऑगस्ट व ७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजून १० मिनिटांनी सुटेल व नागरकोईल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहचेल. ही गाडी गोव्यात मडगाव व थिवी या स्थानकावर थांबेल.

अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस एप डाऊनलोड करावा, असे आवाहन करण्यात

आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT