Goa Special Railway Dainik Gomantak
गोवा

Goa Special Railway: वालंकिणी यात्रेसाठी गोव्यातून विशेष रेल्वे रवाना; फातोर्डा, मडगाव, नावेली, कुडतरीतील भाविकांचा मोठा सहभाग

Goa Special Railway: वालंकिणी यात्रेसाठी गोव्यातून विशेष रेल्वे रवाना; फातोर्डा, मडगाव, नावेली, कुडतरीतील भाविकांचा मोठा सहभाग

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: फातोर्ड्याचे माजी आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या प्रयत्नातून फातोर्डा, मडगाव, नावेली व कुडतरी येथील भाविकांसाठी वालंकिणी यात्रेसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. शुक्रवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत आणि दामू नाईक यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.

दामू नाईक यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून फातोर्ड्यातील भाविकांना वालंकिणीला पाठविले जाते. पूर्वी रेल्वे तिकीट आरक्षणासाठी प्रयत्न करावे लागत होते. यंदा भाविकांची संख्या व तिकिटांची मागणी वाढल्याने विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमामागे कोणतेही राजकारण नसून समाजसेवेची भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष रेल्वेची व्यवस्था करणे हा धाडसी निर्णय असल्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.

सर्व सोयीसुविधांचा पुरवठा

या विशेष रेल्वेमध्ये खाण्या-पिण्याची, वैद्यकीय वगैरे सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय वालंकिणीला या भाविकांना राहण्यासाठी एक मोठे मैदान आरक्षित करण्यात आले असून तिथे तंबू टाकले आहेत. शिवाय तिथे शौचालय, सुरक्षारक्षकांची, फोन चार्जिंगसाठी केबल-प्लग या सुविधांची व्यवस्थाही करण्याचा आल्याचे दामू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT