Mapusa News Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: म्हापशात आरोग्य केंद्राची विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना, शहर होणार मलेरियामुक्त

रुग्ण विखुरलेले : नागरी आरोग्य केंद्राकडून विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News म्हापसा येथील नागरी आरोग्य केंद्राने विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना योग्यरीत्या राबविल्यामुळे म्हापशात सध्या मलेरिया, डेंग्यू आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. तर मलेरिया हा आजार पूर्णतः निर्मूलनाच्या वाटेवर आहे.

मागील वर्षी (2022) म्हापसा नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात मलेरियाचे 9 रुग्ण आढळले होते. हे निर्यात रुग्ण होते. तर 2021 मध्ये 10 रुग्ण आढळले होते, तेही निर्यात होते.

तर चालू वर्षात आतापर्यंत फक्त एकच मलेरिया रुग्ण आढळला असून, हा रुग्ण दिल्लीतून (पर्यटक) गोव्यात दाखल झालेला आहे. तसेच डेंग्यूसदृश 2021 मध्ये 79, 2022 मध्ये 81 व 2023 मध्ये 7 रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण विखुरलेले आहेत आणि एकाच विशेष भागातील नाहीत.

नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात आवश्यक ठिकाणी जलद ताप सर्वेक्षण व डास उत्पत्ती शोध मोहीम नियमितपणे राबविण्यात येते. तसेच, वृत्तपत्रे, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या आजारांविषयी जनजागृती करण्यात येते.

तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून त्यांच्या क्षेत्रात जागृती केली होती.

घरांतर्गत, सोसायटी अथवा बांधकाम आवारात डास उत्पत्ती स्थाने आढळल्यास संबंधितांना नोटिसा बजावल्या जातात. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले असल्याचे सांगितले जात आहे.

आजाराबाबत जनजागृती

आरोग्य यंत्रणेला मलेरियाच्या रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर, यंत्रणेमार्फत रुग्णाचे घर व परिसरातील काही घरांमध्ये तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले जाते.

या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करून मलेरिया संसर्ग आढळला असता, त्यांना तातडीने उपचार दिले जातात.

परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करून त्यामध्ये आवश्यकतेनुसार अळीनाशक औषधे फवारली जातात. मलेरियाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी, सवयी याविषयी जनतेचे प्रबोधन केले जाते.

सीमा भागांत अधिक धोका

ज्या ठिकाणी धोका अधिक, अशा सीमा भागांतील गावांत म्हणजे कुचेली, कोलवाळ, करासवाडा येथे जास्त काळजी घेतली जाते. मलेरियाचे रुग्ण अल्प आहेत.

हे रुग्ण बाहेरील असून मूळचे स्थानिक नाहीत. डेंग्यूचे काही रुग्ण असले तरी ते विखुरलेले आहेत, असे आरोग्याधिकारी डॉ. शॅरल डिसोझा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT